Uncategorized

वालावलच्या गुरुवर्य निमंत्रित भजन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

वालावल | वार्ताहर : कुडाळ तालुक्यातील वालावल येथील श्री देव लक्ष्मीनारायण मंदिरात श्री देव लक्ष्मीनारायणादि स्थानिक सल्लागार उपसमिती व वालावल गावातील भजन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुरुवर्य निमंत्रित भजन स्पर्धा भक्तिमय वातावरणात आणि उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. या स्पर्धेत पाट पंचक्रोशी (कुडाळ) येथील रामकृष्ण हरी भजन सेवा संघाने प्रथम क्रमांक पटकावला. पिंगुळी (कुडाळ) येथील श्री देव रवळनाथ भजन मंडळ द्वितीय, तर मळगाव (सावंतवाडी) येथील समाधी भजन मंडळाने तृतीय क्रमांक मिळविला.

स्पर्धेस जिल्ह्यातील सहा नामांकित भजन मंडळांना निमंत्रित करण्यात आले होते. भजनप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्पर्धेचा उर्वरित निकाल पुढीलप्रमाणे : उत्तेजनार्थ प्रथम – महापुरुष भजन मंडळ (पिंगुळी)**, उत्तेजनार्थ द्वितीय – मोरेश्वर भजन मंडळ (नेरूर), तर उत्तेजनार्थ तृतीय – जैन महालक्ष्मी भजन मंडळ (वालावल). उत्कृष्ट गायक म्हणून रुपेश येमकर, उत्कृष्ट पखवाजवादक म्हणून विराज बावकर (दोन्ही रवळनाथ भजन मंडळ), उत्कृष्ट हार्मोनियमवादक म्हणून भार्गव गावडे (मोरेश्वर भजन मंडळ), उत्कृष्ट तबलावादक दिपक मेस्त्री व उत्कृष्ट झांजवादक अवी भगत (दोघेही जैन महालक्ष्मी मंडळ) यांना गौरविण्यात आले. उत्कृष्ट गजर व कोरसचा पुरस्कार रामकृष्ण हरी भजन सेवा संघाला, तर भजनप्रेमी पुरस्कार साक्षी घाडी यांना प्रदान करण्यात आला. स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ पखवाजवादक मोहन मेस्त्री व गायक रूपेंद्र परब यांनी केले.

स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते झाले. यावेळी वालावलचे सरपंच राजेश (राजा) प्रभू, सेवानिवृत्त गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, सेवानिवृत्त शिक्षक वाय. जे. देसाई, घनश्याम वालावलकर, देवस्थान समितीचे सचिव शेखर परब, खजिनदार ललितकुमार प्रभू, सदस्य लक्ष्मण (गुरू) देसाई, रामचंद्र वालावलकर, युवा उद्योजक संतोष वालावलकर, आनंद वालावलकर, मनोज वालावलकरआदी उपस्थित होते.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​