India Exports | 12 वर्षांत पहिल्यांदाच असं काहीतरी घडलंय… भारताच्या जागतिक व्यापारात झालाय ‘हा’ मोठा बदल!

नवी दिल्ली -भारताच्या निर्यातीत मे महिन्यात विक्रमी बाढ झाल्याचे दिसून येत आहे. निर्यातीतील वाढ १८ टक्के असून आयातही २०.६२ टक्क्यांनी वाढली आहे. मात्र, निर्यात वाढल्याने भारताची ब्यापारी तूट या महिन्यात तुलनेने जवळपास समतोल राहिल्याचे दिसून आले आहे. मे महिन्यात भारताची निर्यात ४५.२ अब्ज डॉलर्स (जवळपास ४ हजार २७५ अब्ज रुपये) झाल्याचे दिसून येत आहे.
भारताची आयातही बाढली असून ती मे मध्ये ७३.४१ अब्ज डॉलर्सची आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधन तेलाचे दर वाढल्याने भारताच्या आयातीचा खर्चही बाढला आहे. तेलदर कमी झाल्यास भारताची व्यापारी तूटही कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती देण्यात आली. १२ वर्षामध्ये विस्तारला पाया गेल्या १२ वर्षामध्ये निर्यात बाढली असे नव्हे, तर निर्यातीचापायाही विस्तारला आहे. भारत आता पूर्वपिक्षा अधिक वस्तू आणि सेवा यांची निर्यात अधिक देशांना करु लागला आहे.
तिप्पट वाढ झाली आहे. भारताने अनेक देशांशी गेल्या दीड वर्षात व्यापार करार केले आहेत.ते जसजसे कार्यान्वित होतील, तशा प्रमाणात देशाचा जागतिक व्यापार वाढत जाणार आहे. आणखी करार केले जाणार आहेत, असे प्रतिपादन अग्रवाल यांनी केले आहे.
चीनकडून आयातीत वाढ
मे मध्ये चीनकडून भारतात होणाऱ्या आयातीत वाढ होऊन ती २४.७ अब्ज डॉलर्सची झाली. भारताने अमेरिकेकडूनही आता इंधन वायू आयात करण्यास प्रारंभदेशाच्या निर्यातीत विक्रमी वाढकेला असून अमेरिकेचा इंधन वायू भारतापर्यंत पोहचू लागला आहे. अमेरिकेला भारताकडून होणाऱ्या निर्यातील मे महिन्यात ०.५ टक्के, तर युरोपियन महासंघाला होणाऱ्या निर्यातील ०.४७ टक्के आणि चीनला होणाऱ्या निर्यातीत २५. ८५ टक्के वाढ झाली आहे.
घाऊक महागाई दरात मोठी वाढ
भारताच्या घाऊक महागाई दरातही वाढ झाली असून ते अर्थव्यवस्थेसाठी चिंतेचे कारण ठरु शकते. मेमध्ये हा दर ९.६८ टक्के आहे. एप्रिलमध्ये तो ८.२६ टक्के होता. हा दर गेल्या ४३ महिन्यांमधील सर्वात अधिक आहे. इंधनाच्या किमती आणि दैनंदिन वस्तूंची किमती वाढणे हे खरे कारण आहे. मे महिन्यात किरकोळ महागाईदर वाढून ३.९३ टक्के झाला आहे. एप्रिलमध्ये तो ३.४८ टक्के होता. घाऊक महागाईचा दर अधिक काळ चढा राहिला तर किरकोळ महागाईचा दरही वाढून ग्राहकांना फटका बसू शकतो. डिझेलचे दर वाढल्याने वाहतुकीचा खर्च वाढला आहे. परिणामी जीवनावश्यक वस्तू आणि इतर वस्तूंचेही दर वाढले आहेत.
Source link



