फुटबॉलचा वैश्विक महासंग्राम आजपासून

यजमान मेक्सिको भिडणार दक्षिण आफ्रिकेशी, दक्षिण कोरिया-चेकिया यांच्यात दुसरी लढत
वृत्तसंस्था
मेक्सिको सिटी : फुटबॉल रसिकांची अखेर प्रतीक्षा संपली असून फिफा विश्वचषक 2026 ची सुऊवात आज मध्यरात्री 12.30 वा. (भारतीय प्रमाणवेळेनुसार) होणार आहे. ही या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वांत मोठी आवृत्ती ठरणार आहे. 1930 मध्ये ही स्पर्धा सुरू झाल्यानंतर प्रथमच 48 संघ फुटबॉलमधील सर्वोच्च विजेतेपदासाठी 104 सामन्यांमध्ये एकमेकांशी भिडणार आहेत.
अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको यांच्या संयुक्त यजमानपणाखाली होणारी आणि महिनाभर चालणारी ही भव्य स्पर्धा 20 जुलै रोजी (भारतीय प्रमाणवेळेनुसार) न्यू जर्सी येथील मेटलाइफ स्टेडियमवर होणाऱ्या अंतिम सामन्याने संपुष्टात येईल. दक्षिण आफ्रिकेचा संघ मेक्सिकोविऊद्धच्या सामन्याने फिफा विश्वचषकाची सुऊवात करेल. हा सामना म्हणजे 2010 च्या विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्याची पुनरावृत्ती असेल. मेक्सिको सिटीमध्ये हा सामना खेळवला जाईल. बरोबर 16 वर्षांपूर्वी सिफिवे तशाबालालाच्या जबरदस्त गोलने दक्षिण आफ्रिकेला आघाडीवर नेले होते. मात्र मेक्सिकोच्या राफेल मार्केझने बरोबरी साधणारा गोल केल्यामुळे दक्षिण आफ्रिकेला अखेरीस 1-1 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले होते.
दक्षिण आफ्रिकेचा संघ आपल्या चौथ्या विश्वचषक स्पर्धेसाठी उत्तर अमेरिकेत दाखल झाला आहे. 16 वर्षांपूर्वी या स्पर्धेचे यजमानपद भूषवल्यानंतर आता ते पुन्हा एकदा या प्रतिष्ठित स्पर्धेत सहभागी होत आहेत. 2014, 2018 आणि 2022 च्या स्पर्धांसाठी पात्रता मिळवण्यात सलग तीन वेळा अपयश आल्यानंतर या आगमनामुळे त्यांचा प्रदीर्घ काळचा वनवास संपला आहे.
दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक ह्युगो ब्रूस यांच्या यंदाच्या फिफा विश्वचषकाच्या तयारीमध्ये अनेक अडथळे आले आहेत आणि त्यांचा संघ पुन्हा एकदा ’अंडरडॉग’ म्हणून मेक्सिको सिटीमध्ये दाखल होत आहे. आता दक्षिण आफ्रिकेला यजमानपदाचा लाभ मिळणार नाही. या सामन्यापूर्वी 29 मे रोजी जोहान्सबर्गमध्ये निकाराग्वाविऊद्ध त्यांनी नीरस गोलशून्य बरोबरी नोंदविली आणि शनिवारी पाचूका येथे जमैकाविऊद्ध प्रेक्षकांविना खेळल्या गेलेल्या सामन्यात 1-1 अशा बरोबरीवर त्यांना समाधान मनावे लागले. अशा निकालांनंतर ते या सामन्यासाठी सज्ज होत आहेत. या कामगिरीमुळे ब्रूस काहीसे निराश झाले. सराव सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून लाइल फॉस्टरने गोल केला, तर जमैकाकडून ड्वेन अॅटकिन्सनने गोल नोंदवला.
कामगिरी माझ्या अपेक्षेप्रमाणे झाली नाही. मला वाटते की, आपण खेळाचे सखोल विश्लेषण केले पाहिजे, नेमक्या काय चुका झाल्या हे पाहिले पाहिजे आणि पुढील काही दिवसांत त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून मेक्सिकोविऊद्धच्या पहिल्या सामन्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार असू, असे ब्रुस यांनी नंतर म्हटले होते.
दुसरीकडे, मेक्सिको संघ या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. त्यांनी यंदा सलग आठ मैत्रीपूर्ण सामन्यांत अपराजित राहण्याची कामगिरी केली आहे. यामध्ये घाना (2-0), ऑस्ट्रेलिया (1-0) आणि सर्बिया (5-1) यांच्याविऊद्धच्या विजयांचा समावेश आहे. गुऊवारी 83,000 इतक्या पूर्ण क्षमतेने भरल्या जाणार असलेल्या स्टेडियममध्ये मेक्सिकोला प्रेक्षकांचा जोरदार पाठिंबा मिळणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा विजय त्यांना ‘गट अ’मध्ये अव्वल स्थान मिळवण्याच्या दृष्टीने मोठी चालना देईल. त्यानंतर ते दक्षिण कोरिया आणि चेक प्रजासत्ताक यांच्याविऊद्धच्या पुढील सामन्यांवर लक्ष केंद्रीत करतील.
विश्वचषकातील पहिला सामना सुरू झाल्यानंतर सात तासांनी ‘गट अ’मधील दुसऱ्या सामन्यात दक्षिण कोरिया आणि चेकिया (चेक प्रजासत्ताक) हे संघ आमनेसामने येतील. या विस्तारित स्पर्धेत प्रत्येक गटातील अव्वल दोन संघांना आणि 12 गटांमधील तिसऱ्या स्थानावर असलेल्या सर्वोत्तम आठ संघांना 32 संघांच्या फेरीत प्रवेश मिळेल.
सामने
1) मेक्सिको वि. दक्षिण आफ्रिका
वेळ : आज मध्यरात्री 12.30 पासून
2) दक्षिण कोरिया वि. चेकिया
वेळ : शुक्रवारी सकाळी 7.30 पासून
Source link



