आरगमध्ये रस्त्याच्या वादातून तुफान राडा

मिरज : तालुक्यातील आरग येथेशेतातून गेलेल्या रस्त्याच्या वादातून दोन गटात तुफान राडेबाजी झाली. लोखंडी रॉड आणि काठ्यांनी मारहाण झाल्यामुळे दोघे जखमी झाले. तसेच – एका चारचाकीही तोडफोड करण्यात आली. याबाबत शंकर शिवाजी भोसले व पृथ्वीराज सदाशिव किणीकर यांनी – मिरज ग्रामीण पोलिसात परस्पर विरोधी तक्रार दिली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
याबाबत अधिक माहिती अशी, आरग येथे रेल्वे स्टेशनजवळ शंकर भोसले व सदाशिव किणीकर यांचीएकमेकालगत शेतजमीन असून, दोघांच्या शेताकडे जाण्यासाठी सामायीक रस्ता आहे. या रस्त्याच्या मालकीवरुन दोघांमध्ये वाद आहेत.न्यायप्रविष्ठ असलेल्या या वादाचा काही दिवसांपूर्वीच निकाल लागला होता. त्यामुळे प्रशासन अधिकारी वपोलिसांच्या समक्ष रस्त्याची मोजणी होणार होती.
तत्पूर्वीच भोसले व किणीकर असे दोघेजण शेतात आले होते. रस्ता प्रश्नावरुन त्यांच्यात पुन्हा वादावादी झाली. वादावादीचे पर्यावसान तुफान राडेबाजीत झाले.यावेळी शंकर भोसले याने पृथ्वीराज किणीकर यांची चारचाकी फोडली. त्यानंतर दोन गटात लोखंडी रॉड आणि काठ्यांनी जोरदार मारामारी झाली. यामध्ये एका महिलेसह दोघेजण जखमी झाले आहेत. याबाबत दोन्ही गटांनी मिरज ग्रामीण पोलिसात तक्रार दिली असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पालीस तपास करीत आहेत.
Source link



