अवघ्या साडेपाच वर्षांच्या समरजीतने स्केटींगसह लाठी काठी फिरवत केला राष्ट्रीय विक्रम

कोल्हापूरच्या अवघ्या साडेपाच वर्षांच्या समरजित विशाल जितकर या चिमुकल्याने इनलाईन स्केटिंगमध्ये लाठी-काठी फिरवत नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. रेड्याची टक्कर, ता. हातकणंगले येथील व्ही. एस. खांडेकर स्केटिंग ट्रॅकवर हा विक्रम करण्यात आला.
अत्यंत आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या इनलाईन स्केटिंगसोबत लाठी-काठीचे कौशल्य दाखवत समरजितने हा विक्रम आपल्या नावावर नोंदवला. गेल्या वर्षभरापासून स्केटिंगचा सराव करणाऱ्या समरजितने अल्पावधीतच उल्लेखनीय प्रगती केली आहे.
सध्या राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षण घेत असलेल्या समरजितला त्याची आई अमृता जितकर व वडील विशाल जितकर यांनी सातत्याने प्रोत्साहन दिले. तसेच एस. के. रोलर स्केटिंग अकॅडमीचे प्रशिक्षक सुहास कारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने या विक्रमासाठी विशेष तयारी केली.
गेल्या काही दिवसांपासून सकाळ-संध्याकाळ नियमित सराव करून समरजित विक्रमासाठी सज्ज झाला होता. विक्रमाच्या दिवशी शेकडो नागरिक, पालक व स्केटिंगप्रेमींच्या उपस्थितीत त्याने लाठी-काठी फिरवत इनलाईन स्केटिंगला सुरुवात केली आणि निश्चित वेळेत निर्धारित अंतर पूर्ण करून उपस्थितांकडून भरभरून दाद मिळवली.
या विक्रमाची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाचे प्रतिनिधी श्री. पवन सोलंकी यांनी ऑनलाइन पद्धतीने केली. विक्रम पूर्ण होताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत समरजितचे अभिनंदन केले.
या यशामुळे समरजित जितकरचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्रासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.
एवढ्या लहान वयात जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्याने मिळवलेले हे यश इतर मुलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. उद्घाटन समारंभ सहा वाजून दहा मिनिटांनी माननीय एन आर बुधले, नगरसेवक अमर समर्थ, संताजी उर्फ बाबा घोरपडे, माझी पोलीस इन्स्पेक्टर संजय दळवी,
उद्योजक सुधीर उर्फ बापू खोत यांच्या हस्ते पार पडला
Source link



