Stock market closes with strong gains on Wednesday.

सेन्सेक्स 1263 अंकांनी वधारत बंद : ट्रम्प यांच्या वक्तव्याचा सकारात्मक परिणाम
जागतिक पातळीवरील बाजारातील तेजीच्या सकारात्मकतेत भारतीय बाजारांनीही बुधवारी तेजीसोबत बंद होण्यात यश मिळवलं आहे. याचदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी लवकरच इराणसोबत पुन्हा लवकरच चर्चा सुरु केली जाणार असल्याच्या वक्तव्याचा सकारात्मक परिणाम बाजारावर दिसला. सेन्सेक्स 1263 अंकांनी तर निफ्टी 388 अंकांनी वाढत बंद झाला.
त. भा. वृत्तसंस्था
मुंबई : मंगळवारी 14 एप्रिल रोजी शेअरबाजाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सुट्टी होती. बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 1263 अंकांनी वाढत 78111 च्या स्तरावर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 388 अंकांनी वाढत 24231 अंकांवर बंद होताना दिसला. सेन्सेक्समधील 30 पैकी 27 समभाग तेजीसोबत बंद झाले तर निफ्टीतील 50 पैकी 47 समभाग तेजी राखत बंद झालेले दिसून आले. निफ्टी बँक निर्देशांक 696 अंकांनी वाढीसोबत 56301 अंकांवर बंद होताना दिसला. मिडकॅप व स्मॉलकॅप निर्देशांकांनीही तेजी राखली होती. आयटी निर्देशांकही बुधवारी फॉर्मात असताना दिसला. हा निर्देशांक सरतेशेवटी 869 अंकांनी मजबूत होत 31539 च्या स्तरावर बंद झाला. बुधवारी क्षेत्रांच्या कामगिरीकडे पाहता ऑटो, आयटी, मेटल व रियल्टी या क्षेत्राच्या निर्देशांकाची कामगिरी चांगली पाहायला मिळाली.
समभागांमध्ये इंडिगो, इटर्नल, विप्रो, टाटा मोटर्स, लार्सन टुब्रो, हिंडाल्को, टीसीएस, मॅक्स हेल्थकेअर, अदानी एंटरप्रायझेस, टेंट, सन फार्मा, टायटन, जियो फायनान्स, एचयुएल, सिप्ला यांचे समभाग तेजीत होते. आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, डॉ. रे•िज लॅब्ज, इंडस टॉवर्स, इंडियन बँक, डिलीव्हरी, सेल, फेडरल बँक, ऑईल इंडिया यांचे समभाग घसरले होते.
तेजीची कारणे
अमेरिका-इराण यांच्यात पुन्हा चर्चा सुरु होण्याच्या बातमीने जागतिक बाजारात उत्साह दिसला. ट्रम्प यांच्या विधानानंतर गुंतवणूकदारांमध्ये उत्साह परतला.
ब्रेंट अर्थात कच्च्या तेलाच्या किमती याचदरम्यान 100 डॉलर प्रति बॅरलच्या खाली घसरलेल्या दिसल्या. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी तेलाच्या किमती कमी होणे सकारात्मक संकेत आहेत. जागतिक बाजारात पाहता अमेरिकेतील बाजार विक्रमी स्तरावर पोहचले होते तर आशियाई बाजारातही तेजीचा उत्साह होता. यातून देशांतर्गत बाजारात खरेदीला बहर आला होता.
Source link



