Uncategorized

हंदिगनूर महालक्ष्मी यात्रेला उत्साहात प्रारंभ

अक्षतारोपणाला हजारो भाविक उपस्थित : आजपासून पै-पाहुण्यांची वर्दळ वाढणार

 वार्ताहर/अगसगे

हंदिगनूरसह सात गावच्या श्री लक्ष्मीदेवी यात्रोत्सवाला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. बुधवार दि. 15 रोजी लक्ष्मीदेवीची ओटी भरणे, रथोत्सव कार्यक्रम होऊन सायंकाळी श्री लक्ष्मीदेवी गदगेवर विराजमान झाली. मंगळवार दि. 14 रोजी सकाळी 6 वाजून 41 मिनिटांनी श्री अक्षतारोपणानंतर यात्रोत्सवाला सुरुवात झाली. यावेळी सुमारे सात गावचे दहा हजारांहून अधिक ग्रामस्थ अक्षतारोपण कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी गावच्या चारीही बाजूंनी मोठी गर्दी झाली होती. बुधवारी सकाळी मारुती मंदिराजवळ श्री महालक्ष्मी देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी महिलांनी देवीला चांदीचा हार अर्पण केला. त्यानंतर दुपारी 2 वाजता रथोत्सवाला सुरुवात झाली. या रथोत्सवात सुमारे 15 हजार भाविक सहभागी झाले होते.

यावेळी दहा टन भंडाऱ्याची उधळण करत श्री लक्ष्मीदेवीचा जयजयकार करत सायंकाळी 6 वाजता लक्ष्मीदेवी गदगेवर विराजमान झाली. संपूर्ण गाव भंडारयाच्या उधळणीत न्हाऊन निघाले होते. ही यात्रा तब्बल 58 वर्षांनंतर भरली आहे.  हंदीगनूरसह म्हाळेनहट्टी, बोडकेनहट्टी, कुरीहाळ खुर्द, कुरीहाळ बुद्रुक, कट्टणभावी, होसोळी या गावांची ही यात्रा असून मोठ्या प्रमाणात यात्रोत्सवाचे स्वरुप निर्माण झाले आहे. गुरुवारपासून दर्शनासाठी भाविकांची, पै पाहुण्यांची गर्दी वाढणार आहे. यासाठी यात्रा कमिटीने ठिकठिकाणी वाहन पार्किंगची व्यवस्था केली आहे. तसेच यात्रोत्सव कमिटीकडून 20 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. सध्या या सर्व गावांमध्ये मोठ्या उत्साहाने आनंदी वातावरणात यात्रोत्सव सुरू आहे. ही यात्रा बुधवार दि. 22 पर्यंत साजरी होणार आहे. यात्रा सुळीतपणे पार पडावी, यासाठी यात्रा कमिटी दिवस-रात्र परिश्रम घेत आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​