Uncategorized

Solapur News | प्रहार शेतकरी संघटनेचा रास्ता रोको

सोलापूर- विजापूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला

सोलापूर : मंद्रूप येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या घटनेतील आरोपींना तत्काल अटक करून कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी प्रहार शेतकरी संघटनेने सोमवारी सोलापूर- विजापूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. आंदोलनामुळे दोन्ही बाजूचा हायवे पूर्णपणे एक तास ठप्प झाला होता.

प्रहार शेतकरी संघटनेचे शहर प्रमुख अजित कुलकर्णी, संपर्कप्रमुख जमीर शेख व कार्याध्यक्ष तायप्पा कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मंद्रूप येथील अल्पवयीन मुलीच्या प्रकरणात पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक न केल्याने संतप्त कार्यकर्ते रस्त्यावरच ठिय्या मांडून बसले.

आंदोलनाची माहिती मिळताच मंद्रूप पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात केला. सुमारे दोन तास महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​