Uncategorized

Solapur News : कॉलेजजवळ थांबलेल्या कारमधून ९५० ग्रॅम मेफेड्रॉन जप्त

                               मेफेड्रॉन ड्रग्ज व कार असा २ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर : शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या पथकाने एका कारमधून १ कोटी ९० लाख रुपये किंमतीचे ९५० ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्ज जप्त केले. ही कारवाई मंगळवारी पहाटे सहाच्या सुमारास शहरातील व्हीआयपी रोडवरील मुस्लीम कब्रस्तानकडून संगमेश्वर कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर केली. या कारवाईत पोलिसांनी दोघांना अटक करून सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी मेफेड्रॉन ड्रग्ज व कार असा २ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

रिजवान शब्बीर खान (वय २६, रा. घर नं. १२३, अंबिका नगर भाग ३, उमर खलीफा मशिदीजवळ, नई जिंदगी, सोलापूर) आणि साहील सिकंदर पिरजादे (वय २५, रा. फ्लॅट नं. ४०६, अल्तमश अपार्टमेंट, मंत्री चंडक नगर, सोलापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांना चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. तर अफजल मुर्शद (रा. मुस्लीम कब्रस्तान जवळ, सोलापूर) असे फरार आरोपीचे नाव आहे. याबाबत सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज येत असून ते विविध महाविद्यालयाशेजारी तसेच तरुण-तरुणींची गर्दी असलेल्या ठिकाणी वितरीत करण्यात येऊन तरुणाईला नशेत ओढण्याचे काम सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे शहर पोलिसांकडून एमडी ड्रग्ज घेऊन येणाऱ्यांवर कारवाईचा धडाका चालू करण्यात आला आहे.

त्यातच शहर गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी हे मंगळवारी पहाटेच्या सुमारास शहरात गस्त करीत असताना पोलीस शिपाई भारत पाटील यांना व्हीआयपी रोडवरील मुस्लीम कब्रस्तानजवळून संगमेश्वर कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर एक संशयित कार उभी असून त्यामध्ये एमडी ड्रग्ज असण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी लागलीच हालचाली करून व्हीआयपी रोडवरील मुस्लीम कब्रस्तानजवळून संगमेश्वर कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर थांबलेल्या एमएच १३ ईएस १४११ क्रमांकाच्या कारला ताब्यात घेतले.

कारमध्ये असलेल्या व्यक्तीस ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याचे नाव रिजवान खान असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी कारची झडती घेतली असता कारमध्ये ड्रायव्हिंग सीटच्या डाव्या बाजूस असलेल्या ड्रॉव्हरमध्ये एका राखाडी रंगाच्या प्लास्टिक पिशवीमध्ये पांढऱ्या रंगाचे मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्ज मिळून आले.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​