Uncategorized

परुळे शाळेसाठी निलेश सामंतांची ६० हजारांची मदत

त.भा.प्रतिनिधी परूळे : माजी सभापती शिक्षण व आरोग्य निलेश सामंत यांनी माजी विद्यार्थी मेळाव्यात शब्द दिल्या प्रमाणे जिल्हा परिषद शाळा परूळे नं. 3 ला संगणक कक्षासाठी रु. ६०,०००/- ची देणगी देत विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळावे, आधुनिक तंत्रज्ञानाशी त्यांची ओळख व्हावी तसेच शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, या उद्देशाने संगणक कक्ष उभारण्यात येत आहे. या उपक्रमासाठी माजी सभापती निलेश सामंत यांनी आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे.
यावेळी शाळेतील शिक्षक, विद्यार्थी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. माजी सभापती निलेश सामंत यांच्या या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा प्रकारे समाजातील विविध घटकांनी शाळेला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी सरपंच प्रणिती आंबडपालकर, माजी विद्यार्थी अध्यक्ष पुरुषोत्तम प्रभू, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष दर्शना नानचे, मुख्याध्यापक रविन्द्र गोसावी, उपाध्यक्ष अमोल मेस्त्री, मुग्धा परुळेकर, शिक्षक शालीक पाटील यासह विद्यार्थी उपस्थित होते.
संगणक कक्षामुळे विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रात्यक्षिक ज्ञानसंगणक कक्षामुळे विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रात्यक्षिक ज्ञान मिळण्यास मदत होणार असून, डिजिटल शिक्षणाला चालना मिळणार आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​