Uncategorized

जिल्हा पोलीस अधीक्षकांसहीत १२ पोलीस अधिकारी व अमलदारांना पोलीस महासंचालक पदक जाहीर

शेखर सामंत सिंधुदुर्ग : महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांच्या वतीने सन २०२६ साठी जाहीर करण्यात आलेल्या ‘उत्कृष्ट सेवा पदक’ आणि ‘अतिउत्कृष्ट सेवा पदका’साठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांच्यासहित सिंधुदुर्गातील तब्बल १२ पोलीस अधिकारी व अमलदारांची निवड झाली आहे. पोलीस दलात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय, निष्कलंक आणि उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल राज्य शासनाकडून हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. आज दिनांक १५ ऑगस्ट रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात या सर्व पदक विजेत्या अधिकारी व अमलदारांना गौरविण्यात येणार आहे.पोलीस दलातील कर्तव्य बजावताना दाखविलेली निष्ठा, सातत्य, शिस्त आणि प्रदीर्घ सेवा यांची दखल घेत शासनाच्या गृह विभागाने वरील अधिकारी व अमलदारांसाठी हा सन्मान जाहीर केला आहे.

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आदेशानुसार संबंधित अधिकारी व अमलदार यांचा १५ ऑगस्ट रोजी सकाळी ७.४५ वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय, सिंधुदुर्ग येथे सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.अतिउत्कृष्ट सेवा पदकाचे मानकरी २५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त सेवा बजावलेल्या अधिकारी-अमलदारांना देण्यात येणाऱ्या अतिउत्कृष्ट सेवा पदकासाठी पोलीस निरीक्षक रामदास नागेश पालशेतकर, पोलीस निरीक्षक संजय पुंडलिक साटम, पोलीस निरीक्षक वासुदेव विश्वनाथ वराडकर, सहा. पोलीस निरीक्षक भालचंद्र मोहन दाभोलकर आणि सहा. पोलीस निरीक्षक डॉमनिक संतान डिसोजा यांची निवड करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांनी विविध ठिकाणी बजावलेल्या दीर्घकालीन सेवेला या पदकाच्या माध्यमातून गौरवाची पावती मिळाली आहे.उत्कृष्ट सेवा पदकासाठी सात जणांची निवड , १५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त सेवा बजावलेल्या अधिकारी-अमलदारांना देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट सेवा पदकासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन मुरलीधर दहीकर, यांच्यासह पोलीस निरीक्षक प्रवीण अशोक कोल्हे, पोलीस हवालदार राकेश रविंद्र कडुलकर, पोलीस हवालदार प्रशांत बाळकृष्ण कारुळकर, पोलीस हवालदार किरण कृष्णा देसाई,पोलीस हवालदार बसवराज पेटू डिसोजा आणि पोलीस हवालदार राहुल शिवाजी काळ पोलीस हवालदार प्रमोद काळसेकर यांची निवड झाली आहे. त्यांच्या दीर्घकाळातील उल्लेखनीय सेवेची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.स्वातंत्र्यदिनाच्या औचित्यावर होणारा हा सन्मान सिंधुदुर्ग पोलीस दलासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.

कायद्याचे रक्षण, नागरिकांची सुरक्षितता आणि कर्तव्याशी असलेली निष्ठा यासाठी अनेक वर्षे कार्यरत राहिलेल्या या अधिकारी-अमलदारांच्या सेवेला मिळालेली ही शाबासकी पोलीस दलातील इतरांनाही प्रेरणादायी ठरणार आहे. या सर्व पदक विजेत्यांचे सिंधुदुर्गातून अभिनंदन होत आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​