Uncategorized

Solapur heatwave news | सोलापुरात सूर्य आग ओकू लागला; ४३ अंशांच्या पार गेलेल्या पाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत

                                उष्णतेच्या लाटेने सोलापूर होरपळले

सोलापूर : सोलापूर शहरासहजिल्ह्यात उन्हाचा तडाखा तीव्र झाला असून, मंगळवारी (१४ एप्रिल २०२६) तापमानाने उच्चांक गाठला आहे. आजचे कमाल तापमान ४३.२ ओ से. इतके नोंदवले गेले असून, वाढत्या उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरड्या हवेमुळे (आर्द्रता २५३) अंगाची लाहीलाही होत असून, दुपारच्या वेळी रस्ते ओस पडू लागले आहेत.हवामान खात्याच्या अंदाजानुसार,नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

नागरिकांनी घ्यावयाची काळजी
उन्हाचा तडाखा आणि वाढते तापमान लक्षात घेता आरोग्य विभागाने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत :

पाण्याचे भरपूर सेवन करा: तहान लागलेली नसली तरीही दिवसातून किमान ३ ते ४ लिटर पाणी प्या. लिंबू सरबत, ताक, लस्सी किंवा शहाळ्याचे पाणी घेतल्यास शरीरातील
पाण्याचे प्रमाण टिकून राहते.

दुपारची वेळ टाळा : सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका. बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा.

पोशाखावर लक्ष द्या: हलक्या रंगाचे, सैल आणि सुती कपडे वापरा. गडद रंगाचे आणि सिंथेटिक कपडे उष्णता शोषून घेतात, त्यामुळे ते टाळावेत.

नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
उष्माघाताची लक्षणे ओळखा : चक्कर येणे, मळमळणे, डोकेदुखी किंवा जास्त घाम येणे ही उष्माघाताची लक्षणे असू शकतात. असे वाटल्यास त्वरित सावलीत विश्रांती घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​