Uncategorized

शेखर सामंत यांना सारस्वत प्रकाशन चा ‘कै.गोविंद लाड स्मृती पुरस्कार’ जाहीर

त.भा.प्रतिनिधी
मुंबई

सामाजिक भान राखत पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल तरुण भारत, संवादच्या सिंधुदुर्ग व रत्नागिरी आवृत्तीचे संपादक शेखर कान्होबा सामंत यांना सारस्वत प्रकाशन संस्था, मुंबईचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘कै. गोविंद मंगेश लाड पुरस्कार’ जाहीर झाला आहे. दि. २५ एप्रिल रोजी माहिम-मुंबई येथे आयोजित सारस्वत चैतन्य गौरव सोहळ्यात नामांकित अस्थिरोग तज्ज्ञ व शल्यविशारद पद्मभूषण डॉ. नंदकिशोर (नंदू) लाड व जीवन विद्या मिशनचे प्रमुख श्री. प्रसाददादा पै यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.सारस्वत प्रकाशन संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘सारस्वत चैतन्य गौरव पुरस्कार सोहळ्यात दरवर्षी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येतो, यावर्षी या गौरव सोहळ्यात तरुण भारत संवादचे संपादक शेखर सामंत यांना वरील पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबरीने सुप्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉ. घनःशाम बोरकर यांना ‘सारस्वत प्रकाशन पुरस्कार, सामाजिक कार्यकर्त्या सुजाता रायकर यांना ‘समाजसेवक के.रविंद्र पाटकर स्मृती पुरस्कार’,दशावतार चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांना कै.प्रमोदीनी व कै. डॉ. प्रभाकर रेगे स्मृती पुरस्कार’, सुप्रसिद्ध सर्जन डॉ. गिरीश लाड यांना कै., एम. एन. देसाई स्मृती पुरस्कार आणि जी. एस. बी. सभ्भा माटुंगा यांना कै. व्ही. डी. पाडगांवकर स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.सामाजिक, संस्थात्मक आणि सातत्यपूर्ण कार्यातून आपल्या कर्तृत्वाची वेगळी ओळख निर्माण करणारे संपादक शेखर सामंत यांनी दीर्घकाळापासून समाजाभिमुख कार्य करीत अनेक क्षेत्रांत आपला ठसा उमटवला असून त्यांच्या या कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.हा गौरव सोहळा माहीम येथील श्रीपाद दत्तात्रय तेंडुलकर मंगल कार्यालय,सारस्वत भवन येथे २५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वा. होणार आहे. या कार्यक्रमाला पद्मभूषण डॉ. नंदकिशोर (नंदू) लाड हे प्रमुख पाहुणे म्हणून व श्री. प्रसादादा पै हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​