Ratnagiri News | रत्नागिरी वनविभागाकडून मृत देवमाशाची शिताफीने विल्हेवाट

रत्नागिरीत दुर्गंधी पसरवणाऱ्या व्हेलची सुरक्षित विल्हेवाट
रत्नागिरी – रत्नागिरी तालुक्यातील नेवरे काजिरभाटी समुद्रकिनारी रविवारी सायंकाळी एक महाकाय व्हेल अर्थात देवमासा वाहत आला होता. कुजलेल्या स्थितीतील या व्हेलमुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे वनविभागाने तातडीने मृत देवमाशाची विल्हेवाट लावावी, अशी मागणी करण्यात येत होती.
दरम्यान, याबाबत माहिती मिळताच भरती-ओहोटीचा अंदाज घेत कांदळवन, वन आणि मत्स्य विभागाच्या पथकाने सोमवारी सकाळीच मृत व्हेलच्या विल्हेवाटीची मोहीम हाती घेतली. समुद्रकिनारी मोठा खड्डा खणून व्हेलला दफन करण्यात आले. त्यामुळे परिसर दुर्गंधीमुक्त झाला.
प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेबद्दल स्थानिक रहिवासी आणि पर्यटकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी वनपाल रत्नागिरी कांदळवन मिलिंद डाफळे,वनरक्षक आरे धनंजय यादव,पशु अधिकारी डॉ. स्वरूप काळे,मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकारी स्मितल कांबळी, नेवरे पोलिस पाटील स्नेहा पेडणेकर उपस्थित होते.
Source link

