Uncategorized

Pandharpur Crime | शेवते गावात रक्ताचा सडा! शेतातील पाईपलाईन फुटल्याच्या किरकोळ कारणावरून दोन गट आमनेसामने

                            शेवते गावात पाइपलाइनच्या वादातून रक्तरंजित हाणामारी

पंढरपूर -शेवते (ता. पंढरपूर) येथे केवळ शेतातील पाइपलाइन फुटल्याच्या किरकोळ कारणावरून दोन गट थेट आमनेसामने आले आणि त्यांच्यात झालेल्या रक्तरंजित हाणामारीने सारा परिसर हादरला आहे. लाठ्या-काठ्या आणि हातोड्याचा वापर करून झालेल्या या जीवघेण्या हल्ल्याने ग्रामीण भागातील वाढत्या गुन्हेगारीवर आणि पोलिसांच्या धाकावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास शेवते शिवारात शक्तिमान कोळी यांच्या शेतात ही घटना घडली. शेतातील पाइपलाइन फुटल्याने झालेल्या नुकसानीच्या कारणावरून मारोती भांडे आणि समोरच्या गटात वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर काही क्षणातच हाणामारीत झाले. एका गटाकडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली, तर दुसऱ्या गटातील संरकार गोडसे यांनी हातात हातोडा घेऊन जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेत दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. भोसे बीटच्या पोलीस दप्तरी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सौदागर अमराळे, आप्पा गोसावी आणि दतू कोळी यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. तर दुसऱ्या गटाने मारोती भांडे, संरकार गोडसे, दीपक कोरके, पांडुरंग नाईकनवरे, पाडुरंग भांडे, समाधान सरगर आणि नितीन कोरके यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली.

शेवते परिसरातील ही घटना अत्यंत गंभीर असून, किरकोळ वादात तलवारी आणि हातोड्याचा वापर होणे हे वाढत्या रानटी प्रवृत्तीचे लक्षण आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधित सर्व संशयितांना तत्काळ अटक करणे गरजेचे आहे. अन्यथा, हा संघर्ष आणखी चिघळून भविष्यात मोठ्या अनर्थाला आमंत्रण देणारा ठरेल. कायदा हातात घेणाऱ्या या दादागिरीला वेळीच लगाम घालावा.

 


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​