Uncategorized

Mirabai Chanu’s Golden Hat-trick

राष्ट्रकुल स्पर्धेत रचला इतिहास : वेटलिफ्ंिटगमध्ये 48 किलो गटात 190 किलो वजन उचलण्याची केली कामगिरी

वृत्तसंस्था

ग्लास्गो

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या चौथ्या दिवशी भारताची ऑलिम्पिक पदकविजेती वेटलिफ्टर मीराबाई चानूने सलग तिसरे सुवर्णपदक पटकावत नवा इतिहास रचला. वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात 48 किलो गटात मीराबाईने 190 किलो वजन उचलून सुवर्ण पदकाची कमाई केली. विशेष म्हणजे, या शानदार कामगिरीसह तिचे कॉमनवेल्थ स्पर्धेत सलग तिसरे सुवर्णपदक ठरले आहे. मीराबाईने यापूर्वी 2018 (गोल्ड कोस्ट) आणि 2022 (बर्मिंगहॅम) स्पर्धेत सुवर्णपदके जिंकली होती. यंदाच्या स्पर्धेतील भारताचे हे तिसरे तर पहिलेच सुवर्णपदक ठरले आहे.

 

स्नॅच प्रकारात मीराबाईने 82 किलो वजनाने सुरुवात केली. पहिल्या प्रयत्नात तिला अपयश आले, मात्र, दुसऱ्या प्रयत्नात तिने 82 किलो वजन उचलले. यानंतर तिसऱ्या प्रयत्नात 85 किलो वजन उचलत तिने स्नॅच प्रकारात नवा राष्ट्रकुल  स्पर्धेचा विक्रम प्रस्थापित केला आणि अव्वल स्थान मजबूत केले. यानंतर क्लीन अँण्ड जर्कमध्ये 105 किलो वजनासह सुरुवात करताना ती पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरली. पण दुसऱ्या प्रयत्नात तिने 105 किलो वजन उचलत शानदार सलग तिसऱ्या सुवर्णपदकाला गवसणी घातली. एकूण 190 किलो वजन उचलत मीराबाईने सुवर्णपदक जिंकले. विशेष म्हणजे, इतर देशाचे वेटलिफ्टर्स तिच्या आसपासही पोहचू शकले नाहीत.

मीराबाईची राष्ट्रकूल स्पर्धेतील कामगिरी

  1. 2018 गोल्डकोस्ट (ऑस्ट्रेलिया) – पहिले सुवर्णपदक
  2. 2022 बर्मिंगहॅम (इंग्लंड) – दुसरे सुवर्णपदक
  3. 2026 ग्लास्गो (स्कॉटलंड) – सलग तिसरे सुवर्णपदक

 

यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील हे पदक माझ्यासाठी अविश्सनीय असे आहे. स्पर्धेत सुवर्ण जिंकण्याच्या निर्धारानेच मी उतरले होते, मला यश मिळाले आहे.

सुवर्णपदक विजेती, मीराबाई चानू


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​