Uncategorized

Kolhapur News : आसमा कुरणेच्या कार्याला पन्हाळाकरांनी केला सलाम.. 

पन्हाळा : आज कोण दुचाकीने तर कोण सायकलने राज्याची अथवा देशाची सफर करतो. मात्र एखाद्या मुलगीने तब्बल 4000 किलोमीटरचा प्रवास धावून करणे ही एक कौतुकाचीच बाब म्हणावी लागेल. असाच एक आगळा वेगळा विक्रम कोल्हापूरच्या सोमवार पेठ येथे राहणाऱ्या आसमा कुरेशी या मुलीने करून दाखवला आहे.
मराठा साम्राज्यातील युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झालेल्या 12 गड किल्ल्यांची सफर आसमाने धावत पूर्ण केल्याबद्दल तिच्या या असामान्य कार्याला पन्हाळकराच्या वतीने सलाम करण्यात आला आहे. कोल्हापुरातील आसमाने जानेवारी महिन्यात जिजामाता जयंती दिवशी आपली मोहीम सिंधुदुर्ग किल्ल्यापासून सुरू केली. असे ती मराठा साम्राज्यातील जे 12 किल्ले जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेले आहेत या किल्ल्यांना तिने भेट देत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास व मराठा साम्राज्याची ओळख संपूर्ण जगाला व्हावी यासाठी ही वेगळी मोहीम तिने सुरू केली.
तब्बल चार महिन्यानंतर ती आज पन्हाळा गडावर पोहोचली आणि या ठिकाणी तिने आपल्या मोहिमेची सांगता केली. त्यामुळे जिद्द व चिकाटी असेल तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून देखील यशाचे शिखर गाठता येते याची प्रचिती आसमाने करून दाखविली आहे. पन्हाळगडावर तिचा बाजीप्रभू पुतळा येथे स्वागत करण्यात आले. त्यानंतर पन्हाळगडावरील शिव मंदिर येथे तिने दर्शन घेतले. यानंतर तिचा नगरपरिषदेसमोर समस्त पन्हाळकरांच्या वतीने तिच्या या असामान्य कार्याचा गौरव करण्यात आला.
याचबरोबर कोल्हापुरातून आसमा बरोबर धावत आलेल्या निहाल नदाफ व पृथ्वीराज संकपाळ यांचा देखील यावेळ सन्मान करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास व मराठा साम्राज्याची ओळख संपूर्ण जगाला व्हावी, त्याचप्रमाणे आजची युवा पिढी ही पूर्णपणे मोबाईल मध्ये गुरफटलेली दिसून येते. त्यामुळे युवा पिढीला त्यातून बाहेर काढण्यासाठी व तिला इतिहासाची ओळख होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने आपण ही मोहीम यशस्वी केली.
पण या मोहिमेच्या सुरुवातीला टायफॉड रोग झाल्याने औषध उपचार करून पुन्हा पंधरा दिवसानंतर मोहीम सुरुवात केली, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला रडायला नाही तर लढायला शिकवले आहे असे आसमा ने सत्कार ला उत्तर देताना संदेश दिला.
यावेळी भारतीय दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत कांबळे, माजी उपनगराध्यक्ष चैतन्य भोसले, माझी नगरसेवक अख्तर मुल्ला नियाज मुल्ला नगरसेवक शहाबाज मुजावर पृथ्वीराज नायकवडी प्रमोद उडाळे मुस्लिम ओबीसी संघटनेचे अध्यक्ष अबिद मोकाशी यांच्यासह पन्हाळ्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​