Ratnagiri News : गोवा बनावटीच्या दारूची लांजा तालुक्यात अवैध विक्री

लांजा : तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून गोवा बनावटीच्या दारूची मोठ्या प्रमाणात आवक आणि बेकायदेशीर विक्री होत असल्याचे चित्र समोर येत आहे. लांजा पोलिसांनी विविध ठिकाणी केलेल्या कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीचा दारूसाठा जप्त केला असून हा दारूसाठा तालुक्यात नेमका पोहोचतो तरी कसा, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
कोंडगे लांजा पोलिसांनी सापुचेतळे, खानवली आदी काळात भागांत अलीकडील केलेल्या दारुविरोधी कारवायांमध्ये विनापरवाना व बेकायदेशीररीत्या दारू विक्री करणाऱ्या व्यक्तींकडून गोवा बनावटीच्या दारूचा मोठा साठा जप्त केला आहे. मात्र हा दारूसाठा तालुक्यात आणला जातो कसा आणि त्यामागे कोणाचे जाळे कार्यरत आहे, याचे उत्तर अद्यापही अनुत्तरित आहे.
दुर्गम तालुक्यातील खेड्यापाड्यांपर्यंत गोवा बनावटीची दारू सहज उपलब्ध होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या अवैध व्यवसायामागे एखादे मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Source link



