Uncategorized

Get a cigarette as soon as you order coffee.

जगभरात सिगारेटला आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक मानले जाते. सिगारेटच्या पाकिटावरही भीतीदायक चित्रं आणि इशाऱ्याद्वारे लोकांना धूम्रपान जीवघेणे ठरू शकते असे सांगण्यात येते. डॉक्टर आणि आरोग्यतज्ञांनुसार सिगारेट ओढल्याने कॅन्सर, फुफ्फुसांचे आजार आणि श्वसनाशी निगडित अनेक गंभीर समस्यांचा धोका वाढतो. याचमुळे सरकारे देखील लोकांना यापासुन दूर राहण्याचा सल्ला देतात आणि अनेक देशामंध्ये याच्या विरोधात कठोर नियम तयार करण्यात आले आहेत.

आजच्या काळात लोक फिट आणि हेल्दी लाइफस्टाइल अवलंबिण्यावर जोर देत असतात, तर सिगारेटला धोकादायक व्यसनाच्या स्वरुपात पाहिले जाते. परंतु एखाद्या कॅफेत कॉफी ऑर्डर केल्यावर मोफत सिगारेट देखील सर्व करण्यात आल्यास कुणीही चकित होऊन जाईल. परंतु युरोपमधील देश बोस्निया आणि हर्जेगोविनाच्या काही कॅफेंमध्ये ही परंपरा दीर्घकाळापासून पहायला मिळते. ही अनोखी बाब आता सोशल मीडियावर लोकांचे लक्ष वेगाने वेधून घेत आहे.

कॉफीसोबत सिगारेट

व्हायरल पोस्टमध्ये एका कॅफेचे अत्यंत वेगळे दृश्य दिसून येत. टेबलवर कॉफीचा कप ठेवण्यात आला आहे आणि त्याच्यासोबत एका छोट्या प्लेटमध्ये सिगारेटही सर्व करण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे कॉफीसोबत कुकीज किंवा स्नॅक्स दिले जातात. परंतु तेथे सिगारेटलाही ऑफरचा हिस्सा करण्यात आले आहे. पहिल्या नजरेत हे दृश्य लोकांना हैराण करते. सोशल मीडियावर अनेक युजर्स हे पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. काही लोक या प्रकाराला विचित्र ठरवत आहेत, तर काही जण याला तेथील जुनी परंपरा आणि कॅफे कल्चरचा हिस्सा मानत आहेत.

आदरातिथ्याचे माध्यम

बोस्निया आणि हर्जेगोविनाच्या काही भागांमध्ये कॉफी केवळ एक पेय नव्हे तर लोकांदरम्यान वेळ घालविण्याचे आणि दीर्घ संभाषणाचे माध्यम मानले जाते. अशास्थितीत अनेक कॅफेंमध्ये कॉफीसोबत सिगारेट ठेवणे आदरातिथ्याचे प्रतीक मानण्यात येते. परंतु बदलता काळ आणि नव्या नियमांनंतर आता ही परंपरा पूर्वीप्रमाणे सामान्य राहिली नाही.

सोशल मीडियावर मजेशीर प्रतिक्रिया

यासंबंधीचा व्हिडिओ शेअर करण्यात आल्यावर लोक यावर जोरदार कॉमेंट करत आहेत. काही लोकांनी याला जगातील सर्वात वेगळे आदरातिथ्य ठरविले आहे. तर अनेक युजर्स या अनोख्या कॅफे कल्चरचे कौतुक करताना दिसून आले. लोकांच्या मजेशीर प्रतिक्रियांमुळे ही पोस्ट आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​