Uncategorized

शिगेला आजाराचा केरळमध्ये कहर

126 जणांना संसर्ग : एका मुलाच्या मृत्यूमुळे भीतीचे वातावरण

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आता केरळमध्ये एक नवीन आरोग्यविषयक संकट उभे ठाकले आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, केरळमध्ये शिगेलाने संक्रमित झालेल्या एका चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. केरळच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केली आहे. या संसर्गाने 126 जण बाधित झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. संसर्गग्रस्त तीन मुलांना कोझिकोड मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी दोघे बरे झाले, परंतु एका मुलाची प्रकृती खालावल्याने त्याचा मृत्यू झाला. लहान मुलांना या संसर्गामुळे गंभीर गुंतागुंत होण्याचा सर्वाधिक धोका असल्यामुळे सर्व पालकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

अलीकडच्या वर्षांत संसर्गजन्य रोगांमुळे केरळ हे देशातील सर्वाधिक प्रभावित राज्य ठरले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. लेप्टोस्पायरोसिसची प्रकरणे असोत, मेंदूशी संबंधित अमिबा संसर्गाचा धोका असो, हिपॅटायटीस ए संसर्ग असो किंवा निपाह असो, या सर्वांमुळे आरोग्य सेवांबाबत सातत्याने चिंता वाढली आहे. आता या वर्षाच्या सुरुवातीपासूनच केरळमध्ये शिगेलाची अनेक प्रकरणे नोंदवल्यामुळे सार्वजनिक आरोग्याबाबत चिंता वाढली आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​