Uncategorized

Gadhinglaj | रस्ताच्या कामामुळे महागाव परिसरातील प्रवास बनलाय धोकादायक

                     गडहिंग्लज-चंदगड मार्गाच्या कामामुळे वाहनधारक त्रस्त

महागाव – सध्या गडहिंग्लज-चंदगड व आजरा -हलकर्णी या राज्यमार्गाचे सिमेंट कॉक्रिटीकरणाचे काम सुरू आहे.या कामाकरिता जुना डांबरी रस्ता खोदून रुंदीकरण, खडीकरण, सपाटीकरण, कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू झाले आहे.मात्र सद्यःस्थिती मध्ये सदरच्या ठेकेदाराने कासव गतीने काम सुरू केले असून एका बाजूचा रस्ता हा सलग कॉंक्रिटीकरण करून पूर्ण करणे गरजेचे असताना देखील तो जागोजागी अपूर्ण अवस्थेत ठेवला आहे. त्यामुळे वाहन धारकांना काँक्रिटीकरणाच्या एक पदरी मार्गावरून प्रवास करताना तो रस्ता कोणत्या ठिकाणी ब्रेक झाला आहे हे कळत नाही,शिवाय आवश्यक त्या ठिकाणी दिशादर्शक फलक नाहीत.त्यामुळे वाहनधारक रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत.शिवाय तयार झालेल्या काँक्रीटच्या रस्त्यावरून रात्रीच्यावेळी समोरच्या वाहनाचा अंदाज न आल्याने वाहन रस्त्यावरून घसरून वाहतुकीची समस्या गंभीर बनत आहे.

दोन्ही राज्य मार्गावरील सुस्थितीत असणारा डांबरीकरणाचा रस्ता एका बाजूचे कॉंक्रिटीकरण पूर्ण होईपर्यंत तसाच ठेवणे आवश्यक होते, जेणेकरून एका बाजूने तरी किमान वाहतूक सुस्थितीत सुरू राहिली असती मात्र तो देखील जेसीबीच्या सहाय्याने खोदून ठेवला आहे सर्व मार्गावर दगड – गोट्यांचे, खडीचे व खड्ड्यांचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात पसरले आहे. त्यामुळे जीव धोक्यात घालून सदर मार्गावरून वाहनधारकांना प्रवास करावा लागत आहे.याचा वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

पूर्व भागातील हलकर्णी हे एक मोठे गाव असून या गावची यात्रा २१ एप्रिल ते २५ एप्रिलच्या दरम्यान होत आहे.त्यानंतर या दोन्ही मार्गाला लागून असलेल्या बिद्रेवाडी, कळविकट्टी, कोळिंद्रे या गावच्या यात्रा मे महिन्यामध्ये होत असल्यामुळे यात्रा कालावधीच्या अगोदरच या रस्त्याचे काम पूर्ण व्हावे याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना सभापती डॉ.प्रतिभा चव्हाण यांनी या अगोदरच दिले आहे.

दोन्ही राज्यमार्ग हे अत्यंत रहदारीचा आहेत.कारण या मार्गावरुन गडहिंग्लज तालुक्याचा पूर्व भाग हा गडहिंग्लज तालुक्यातील पश्चिम भागातील तळ कोकणात व पुढे गोवा राज्याला जोडला आहे. तर महागाव परिसरातील नागरिकांना गडहिंग्लज -चंदगड राज्य मार्गावरून कोल्हापूर व विरुद्ध बाजूला असलेल्या बेळगाव किंवा गोव्याला जाण्यासाठी उपयोग होतो.
याशिवाय महागावातून याच मार्गावरील हसुरवाडी येथील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी व रुग्णांना या मार्गावरून ये- जा करावी लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य पायाभूत रस्ते विकास महामंडळाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठेकेदारास आवश्यक ते आदेश निर्गमित करावेत तसेच कामावर नियंत्रण ठेवावे .अशी मागणी होत आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​