Uncategorized

Bhopal Crime रात्री अचानक कॉल कट झाला अन् ५ मिनिटांनी मृत्यू, न्यायाधिशाच्या सुनेचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबियांचा घातपाताचा आरोप

मध्यप्रदेशातील भोपाळमधून एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे.  मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एका निवृत्त न्यायाधीशांची ३१ वर्षीय सून तिच्या पतीच्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली , अशी माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली.

ही घटना मंगळवारी रात्री शहरातील कटारा हिल्स परिसरात घडली. पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, मूळची उत्तर प्रदेशातील नोएडा येथील असलेल्या या महिलेने , २०२४ मध्ये एका डेटिंग ॲपद्वारे भेटल्यानंतर, डिसेंबर २०२५ मध्ये भोपाळस्थित वकिलाशी लग्न केले होते.

कुटुंबियांचा छळाचा आरोप

कटारा हिल्स पोलीस ठाण्याचे प्रभारी सुनील कुमार दुबे यांनी सांगितले की, महिलेच्या माहेरच्या लोकांनी तिच्या सासरच्या मंडळींवर हत्येचा आरोप केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे, असे वृत्तसंस्थेने म्हटले आहे. ती तिच्या सासरच्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली, असे पोलिसांनी सांगितले . तिचा नवरा आणि सासू यांनी तिला रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

कुटुंबाने मुलीच्या शेवटच्या फोन कॉलची आठवण सांगितली.

मिळालेल्या माहितीनुसार, त्या महिलेने घटनेच्या काही तास आधी आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधला होता. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. एनडीटीव्ही या वृत्तसंस्थेच्या आणखी एका वृत्तानुसार, मृताच्या कुटुंबीयांनी सांगितले की, तिने मंगळवारी रात्री सुमारे १०:०५ वाजता तिच्या आईला फोन केला होता. तिच्या कुटुंबीयांनी दावा केला आहे की, तिला भोपाळ सोडून नोएडाला परतायचे होते.

अचानक कॉल कट झाला अन्

संभाषण सुरू असताना तिचा नवरा खोलीत आल्यानंतर तिने अचानक कॉल कट केला,” असे भारतीय लष्करातील अधिकारी असलेल्या तिच्या भावाने सांगितल्याचे अहवालात म्हटले आहे.

“त्यानंतर आमच्या कुटुंबीयांकडून तिच्याशी, तिच्या पतीशी आणि तिच्या सासूशी संपर्क साधण्याचे वारंवार प्रयत्न करण्यात आले, पण कोणीही प्रतिसाद दिला नाही,” असे त्यांनी पुढे सांगितले.

रात्री सुमारे १०:१५ वाजता, तिच्या सासूने घरच्यांकडून आलेल्या फोनला उत्तर दिले. तिच्या कुटुंबीयांनी तिला ताबडतोब तिची चौकशी करण्यास सांगितले, असे म्हटले जाते. सुमारे पाच मिनिटांनंतर, रात्री १०:२० वाजता, तिचा श्वास थांबला असल्याची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली, असे अहवालात पुढे म्हटले आहे


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​