Uncategorized

Attack on Indian Sheep नौकांवरील हल्ल्याचा भारताकडून निषेध इराणच्या राजदूताला पाचारण, दिली समज

► वृत्तसंस्था नवी दिल्ली
होर्मुझच्या सामुद्रधुनीत भारताचे नाविक असणाऱ्या तेलवाहक नौकांवर इराणने केलेल्या हल्ल्यांचा तीव्र निषेध भारताने नोंदविला आहे. इराणच्या भारतातील राजदूताला भारताच्या परराष्ट्र विभागात यासाठी पाचारण करण्यात आले. असे हल्ले भारताला अमान्य असून ते त्वरित थांबविले गेले पाहिजेत, अशी समज इराणच्या राजदूताला देण्यात आली आहे. या हल्ल्यांमध्ये भारताच्या एका नाविकाचा मृत्यू झाला असून काहीजण जखमी आहेत. हे हल्ले सोमवारी करण्यात आले होते.

बहिया आणि मोंबासा नौकांवर हल्ले

‘बहिया’ आणि ‘मोंबासा’ या तेलवाहक नौकांवर हे हल्ले चढविण्यात आले होते. या नौकांवर एकंदर 46 नाविक होते. त्यांच्यापैकी 30 भारतीय नाविक होते. बहिया या नौकेवरील 12 भारतीय नाविकांपैकी एकाचा दु:खद मृत्यू या हल्ल्यात झाला असून चारजण जखमी झाले आहेत.

मोंबासा या नौकेवर एकंदर 18 भारतीय नाविक होते. त्यांच्यापैकी 9 जण जखमी झाले असून त्यांच्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतील परिस्थितीवर संयुक्त अरब अमिरातीतील भारतीय अधिकारी लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती भारताकडून देण्यात आली.

हेही वाचा : Shraddha Walkar Murder Case श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी आरोपी आफताबला पश्चात्ताप नाहीच, पॉलीग्राफ टेस्टमध्ये धक्कादायक निष्कर्ष

जलमार्ग मुक्त असावेत
आंतरराष्ट्रीय जलमार्ग वाहतुकीसाठी मुक्त असले पाहिजेत, अशी स्पष्टोक्ती भारताकडून इराणच्या उपराजदूताकडे करण्यात आली. तेलवाहतुकीसाठी अतिमहत्वाची असणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीवर नियंत्रणासाठी सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात संघर्ष होत आहे.

अमेरिकेने या सामुद्रधुनीवर असणाऱ्या इराणच्या सर्व बंदरांमधून होणाऱ्या वाहतुकीवर निर्बंध लादले आहेत. तसेच अन्य देशांच्या नौकांवर 20 टक्के शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. तर इराणने ही सामुद्रधुनी पुन्हा बंद केल्याची घोषणा केल्याने आधीच असलेल्या तणावात भर पडली आहे.

तेलाच्या दरात वाढ

होर्मुझ सामुद्रधुनीसंबंधी वाद वाढल्याने पुन्हा कच्च्या इंधन तेलाच्या दरांमध्ये वाढ होताना दिसत आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये तेलदरात 10 डॉलर्स प्रतिबॅरलची वाढ झाली असून आता दर जवळपाळ 86 ते 88 डॉलर प्रतिबॅरलवर पोहचला असून तो पूर्वपदावर येण्यासाठी हा संघर्ष त्वरित थांबणे आवश्यक असल्याचे दिसून येते.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​