Uncategorized

Abhishek Banerjee Controversy |अभिषेक बॅनर्जी यांना न्यायालयाचा तूर्त दिलासा, अमतला येथील पक्ष कार्यालयाच्या पाडकामाला स्थगिती

► वृत्तसंस्था कोलकाता
दक्षिण 24 परगणा जिह्यातील अमतला येथील तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघातील कार्यालयाच्या पाडकामाला कोलकाता उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. न्यायालयाने रविवारी झालेल्या विशेष सुनावणीदरम्यान जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत इमारतीची ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले.

विशेष सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती राजा बसू चौधरी यांनी राज्य सरकारला अमतला इमारतीशी संबंधित सर्व कागदपत्रे न्यायालयात सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी नियमित खंडपीठासमोर होईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

दक्षिण 24 परगणा जिल्हा प्रशासनाने शनिवारी आमतला येथील कार्यालय पाडण्यास सुरुवात केली. ही इमारत मंजूर आराखड्याशिवाय बांधण्यात आली होती आणि लागू असलेल्या बांधकाम नियमांचे उल्लंघन केल्याच्या आधारावर ती बेकायदेशीर ठरवून कारवाई करण्यात आली. आता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत इमारतीचे कोणतेही पाडकाम केले जाणार नाही.

या काळात, राज्य सरकारला बांधकामाशी संबंधित सर्व कागदपत्रे न्यायालयासमोर सादर करावी लागतील, त्यानंतर नियमित खंडपीठ या प्रकरणावर पुढील निर्णय देईल. ही इमारत ‘लीप्स अँड बाउंड्स’ या कंपनीची असल्याचे म्हटले जाते. या कंपनीने पाडकामाला आव्हान देत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दुसऱ्या एका प्रकरणात अभिषेक बॅनर्जी यांना याच कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून आरोपी केले आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​