भारतविरोधी कारवायांना थारा मिळणार नाही!

श्रीलंकेच्या राष्ट्रपतींकडून आश्वासन : संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांनी घेतली भेट : संरक्षण सहकार्य करार
वृत्तसंस्था, कोलंबो
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांची भेट घेतली. यावेळी राजनाथ सिंह यांनी संकटसमयी श्रीलंकेच्या खांद्याला खांदा लावून उभ्या राहण्याच्या भारताच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला आहे. तर श्रीलंकेच्या भूमीचा वापर कधीच भारतविरोधी कारवायांसाठी होऊ देणार नसल्याचे दिसानायके यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
दिसानायके यांनी हंबनटोटा बंदराच्या संदर्भाने भारताला महत्त्वाचे आश्वासन दिले आहे. हंबनटोटा बंदर हे 2017 साली 99 वर्षांच्या भाडेतत्वावर चीनच्या नियंत्रणात सोपविण्यात आले होते. चीन तेथे कंटेनर क्षमता विकसित करून त्या भूमीचा वापर सामरिक आणि व्यावसायिक घडामोडींसाठी करत आहे.
3 करारांवर स्वाक्षरी
भारत आणि श्रीलंकेने संरक्षण सहकार्य वाढविण्यासाठी 3 करारांवर स्वाक्षरी केली असून यात श्रीलंकेच्या वायुदलाकडून वापरण्यात येणाऱ्या भारतनिर्मित हवाई सुरक्षा गन एल70 ला अपग्रेड करण्याचा करारही सामील आहे. तर नॅशनल कॅडेट कोर (एनसीसी) तसेच आणि नॅशनल डिफेन्स कॉलेजदरम्यान (एनडीसी) सहकार्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. दिसानायके आणि राजनाथ सिंह यांनी यावेळी भारतीय सैन्याकडून निर्मित तीन पूलांचे व्हर्च्युअल उद्घाटन केले.
संकटकाळात भारत नेहमीच सर्वप्रथम मदतीसाठी सरसावला आहे. श्रीलंकेच्या आमच्या मित्रांसोबत आम्ही ठामपणे उभे राहू असा विश्वास देऊ इच्छितो. खरे मित्र चांगल्या आणि वाईट दोन्ही स्थितींमध्ये परस्परांना साथ देतात असे आमचे ठाम मानणे असल्याचे राजनाथ सिंह यांनी दिसानायके यांच्यासोबतच्या चर्चेदरम्यान म्हटले आहे.
ऑपरेशन सागर बंधूचा उल्लेख
मागील वर्षी ‘डिटवाह’ चक्रीवादळानंतर भारताने श्रीलंकेच्या मदतीसाठी तातडीने ‘ऑपरेशन सागर बंधू’ अभियान राबविले होते. भारतीय सशस्त्र दल आणि श्रीलंकेच्या शासकीय यंत्रणांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे लोकांचा जीव वाचविणे, संपर्कव्यवस्था पूर्ववत करणे आणि मदत-चिकित्सा सहाय्य पोहोचविण्यास मदत मिळाल्याचा उल्लेख राजनाथ सिंह यांनी यावेळी केला.
शेजारी प्रथम धोरण
श्रीलंका भारताच्या ‘शेजारी प्रथम’ धोरण आणि ‘महासागर’च्या व्हिजनच्या केंद्रस्थानी असल्याचे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. तसेच दिसानायके यांच्या राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या. दोन्ही देशांदरम्यान विशेष संबंधांना आणखी मजबूत करण्यासाठी पंतप्रधान मोदी हे दिसानायके यांच्यासोबत मिळून काम करणे जारी ठेवण्यास इच्छुक असल्याचे राजनाथ सिंह यांनी चर्चेदरम्यान सांगितले. भारत ‘इकोनॉमिक अँड टेक्निकल कोऑपरेशन अॅग्रिमेंट’वर (ईटीसीए) वेगाने पुढे जाण्यास इच्छुक आहे. दिसानायके यांची दूरदृष्टी आणि समर्थनाने भारत-श्रीलंका संबंध नव्या उंचींवर पोहोचतील, ज्यामुळे दोन्ही देश, तेथील लोक आणि व्यापक क्षेत्राला लाभ होईल असा भरवसा संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
भारतीय समुदायाला संबोधन
राजनाथ सिंह यांनी तत्पूर्वी श्रीलंकेतील भारतीय समुदायाला संबोधित केले. यावेळी त्यांनी भारताच्या आकर्षक आंतरराष्ट्रीय परिवर्तनावर जोर देत मागील दशकात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशाने 38 देशांसोबत यशस्वीपणे मुक्त व्यापार करार केला असल्याचे निदर्शनास आणून दिले. विविध व्यापार करार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व कौशल्य आणि भारताच्या कूटनीतिकत सेच आर्थिक क्षमतेचा पुरावा आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.
Source link



