Uncategorized

फायर, रेस्क्यू आणि इमर्जन्सीसाठी आता 101 नाही, तर 112 डायल करा! गोव्यात हेल्पलाईन व्यवस्थेत मोठा बदल

पणजी : गोवा अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा विभागाने आपल्या हेल्पलाइन व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल केला आहे. विभागाची 101 ही हेल्पलाइन आता आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली 112 शी जोडण्यात आली आहे. त्यामुळे 101 क्रमांकावर करण्यात आलेले कॉल आता स्वयंचलितपणे 112 क्रमांकावर वळवले जातील.

या नव्या व्यवस्थेमुळे नागरिकांकडून येणाऱ्या आपत्कालीन कॉलची नोंद, प्रक्रिया आणि संबंधित पथकाकडे माहिती पाठवण्याची कार्यवाही 112 प्रणालीद्वारे केली जाणार आहे. त्यामुळे आग, बचावकार्य किंवा इतर गंभीर आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी आता थेट 112 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अग्निशमन आणि बचाव सेवेशी संबंधित प्रत्येक कॉल तातडीने योग्य पथकापर्यंत पोहोचवण्यासाठी ही व्यवस्था अधिक परिणामकारक ठरण्याची अपेक्षा आहे. मात्र, आपत्कालीन यंत्रणेवरील अनावश्यक ताण टाळण्यासाठी नागरिकांनी 112 क्रमांकाचा वापर केवळ वास्तविक आग, बचाव किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीसाठीच करावा, असे विभागाने स्पष्ट केले आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​