Uncategorized

वंदे मातरमसंबंधी विधेयक राज्यसभेत सादर गायनात व्यत्यय आणल्यास तुरुंगवासाची शिक्षा : गदारोळामुळे चर्चेत व्यत्यय

► वृत्तसंस्था नवी दिल्ली
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा गदारोळाने गाजला आहे. सलग पाचव्या दिवशी शुक्रवारीही दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा सुरू होऊ शकली नाही. गदारोळामुळे अध्यक्षांनी दिवसाचे कामकाज तहकूब केले. मात्र, राज्यसभेत शुक्रवारी कामकाज तहकूब होण्यापूर्वी, गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी वंदे मातरम राष्ट्रगीताशी संबंधित असलेले ‘राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंध (सुधारणा) विधेयक, 2026’ सादर केले. ‘वंदे मातरम’चा आदर सुनिश्चित करण्यासाठी हे एक आवश्यक पाऊल असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

विरोधी पक्षांचा विरोध आणि गदारोळात सादर झालेल्या या विधेयकावरील चर्चा सुरू होऊ शकली नाही. डावे पक्ष या विधेयकाला विरोध करत आहेत. गदारोळामुळे उपसभापती हरिवंश यांनी सोमवार, 27 जुलै रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब केले. सरकारने मांडलेल विधेयक राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत ‘जन गण मन’ प्रमाणेच ‘वंदे मातरम’ या राष्ट्रगीताला कायदेशीर संरक्षण देण्याचा प्रयत्न करते.

एकदा हे विधेयक संसदेने मंजूर करून कायदा झाल्यावर, वंदे मातरम गाण्यात अडथळा आणणाऱ्याला राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याबद्दल सध्या लागू असलेल्या शिक्षेप्रमाणेच शिक्षा होईल. वंदे मातरमचा अपमान केल्याबद्दल दोषी आढळलेल्या कोणालाही तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

शुक्रवारी सकाळी 11 वाजता राज्यसभेचे कामकाज सुरू झाल्यावर विरोधी पक्षांच्या गदारोळात सूचीबद्ध कामकाज हाती घेण्यात आले. त्यानंतर दुपारी 12 वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आले.

दुपारी 12 वाजता दुसऱ्यांदा कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतरही गदारोळ सुरूच राहिला. त्यानंतर कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. दुपारी 2 वाजता तिसऱ्यांदा कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर, गदारोळातच हे विधेयक सादर करण्यात आले होते. मात्र, त्यावर चर्चा होऊ शकली नाही. आता पुढील आठवड्यात होणाऱ्या कामकाजावेळी चर्चा होऊ शकते.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​