Uncategorized

वीज वितरणच्या निष्क्रिय कारभाराविरोधात आचरा ग्रामस्थांचा एल्गार

आचरा प्रतिनिधी : कार्यकारी अभियंता विद्युत वितरण कणकवली यांची भेट घेऊन माजी आमदार वैभव नाईक यांनी मालवण तालुक्यातील आचरा सबस्टेशन येथे कायमस्वरूपी अधिकारी नियुक्त करावा अशी मागणी केली होती यावेळी कार्यकर्ते ग्रामस्थ यांच्या सोबत भेट घेत समस्या मांडत आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र या गंभीर बाबीकडे आपले वेळोवेळी लक्ष वेधून, पत्र व्यवहार करूनसुद्धा आपणाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही, त्यामुळे गुरुवार २३ रोजी सकाळी ११.०० वाजता ग्रामस्थांना घेऊन आचरा (सब स्टेशन) वीज वितरण कार्यालय येथे माजी आमदार वैभव नाईक टाळे ठोको आंदोलन छेडणार आहेत. याबातची माहिती मंगेश टेमकर यांनी दिली

मालवण तालुक्यातील आचरा सबस्टेशन येथे दीर्घ काळापासून अधिकारी नसल्यामुळे नागरिकांना सातत्याने गंभीर अडचणीना सामोरे जावे लगत आहे. वीज पुरवठ्यातील बिघाड, तक्रारीचे वेळेवर न होणारे निवारण तसेच प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या गंभीर बाबीकडे आपले वेळोवेळी लक्ष वेधून, आपणास पत्र व्यवहार करूनसुद्धा आपणाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही आचरा येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी याबाबत निवेदनाची प्रत आचरा पोलीस ठाण्यात दिली आहे यावेळी मंगेश टेमकर, लवू मालंडकर, समीर लब्दे, जगदीश पांगे, चंदन पांगे, परेश तारी, रुपेश घाडी, नितीन घाडी, वा्यंगणकर, संजय तारी, माणिक राणे आदी उपस्थित होते.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​