Uncategorized

Abhijit Deepke | मोठी बातमी! दिल्लीतील आंदोलनाला मोठं वळण! अभिजीत दीपकेंनी उपोषण मागे घेतलं

दिल्ली – आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. आंदोलक अभिजीत दीपके यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे… दिल्लीच्या जंतर मंतरवर अभिजीत दिपके हे उपोषणाला बसले होते. ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती चिंताजणक होती म्हणुन त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.. त्यांची जागी अभिजीत दीपके आमरण उपोषणाला बसले होते.. पण ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या विशेष विनंतीनंतर आंदोलक अभिजीत दीपके यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.

एकीकडे दिल्लीतील राजकीय आणि आंदोलनाचे वातावरण आता अधिकच तापले असून, कॉकरोच जनता पार्टीच्या ‘संसद मार्च’चे पडसाद थेट संसदेत उमटायला सुरुवात झाली आहे. हजारो तरुणांच्या सहभागासह हा मोर्चा आता संसदेच्या दिशेने वेगाने पुढे सरकत असून, तरुणांकडून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. रस्त्यावरील या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या तणावाचे तीव्र पडसाद लोकसभेतही पाहायला मिळाले, ज्यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. तर दुसरीकडे, कोंडी फोडण्यासाठी प्रशासकीय पातळीवर वेगवान हालचाली सुरू झाल्या असून, कॉकरोच जनता पार्टीचे एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या भेटीसाठी गेले आहे.

एकीकडे हजारो तरुण संसदेवर धडकण्याच्या तयारीत असतानाच, दुसरीकडे केंद्रीय मंत्र्यांसोबत सुरू झालेल्या या थेट चर्चेतून नेमका काय तोडगा निघणार, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे..


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​