Uncategorized

मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये ‘मार्केट डे’ उत्साहात

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये १८ जुलै २०२६ रोजी ‘मार्केट डे’ उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांसाठी आनंददायी शनिवार साजरा करण्याच्या उद्देशाने रोझरी इंग्लिश स्कूल, मालवण येथे ‘मार्केट डे’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला. प्रशालेचे मुख्याध्यापक फादर ॲन्थनी डिसोज़ा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच प्रशालेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाच्या सहयोगाने या ‘मार्केट डे’ उपक्रमाची आखणी करण्यात आली.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी रानभाज्यांची विक्री करून प्रत्यक्ष व्यवसायाचा अनुभव घेतला. प्रत्येक विद्यार्थ्याने विक्रेता आणि ग्राहक अशा जबाबदारी व भूमिका प्रत्यक्ष जाणून घेतल्या. रानभाज्यांची मांडणी, ग्राहकांशी संवाद, विक्री आणि पैशांचे व्यवस्थापन अशा विविध बाबींचा अनुभव विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून मिळाला. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आनंददायी, ज्ञानवर्धक, प्रोत्साहक आणि प्रेरणादायी ठरला असे विद्यार्थी विद्यार्थिनींनी सांगितले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कार्यव्यग्रतेचा आनंद, काम करण्याची जिद्द, चिकाटी, संयम, आत्मविश्वास, जबाबदारीची जाणीव आणि व्यावसायिक दृष्टिकोन यांचा अनुभव आविष्कार पाहायला मिळाला आणि अशा अनुभवात्मक शिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, संवादकौशल्य, आर्थिक साक्षरता आणि उद्योजकतेची बीजे रुजण्यास निश्चितच मदत होणार आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

या उपक्रमाला पालक वर्गाने केलेले सहकार्य दिलेला पाठिंबा आणि प्रतिसादाबद्दल रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक फादर ॲन्थनी डिसोझा यांनी विशेष कृतज्ञापर समाधान व्यक्त केले आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​