शक्तीपीठ महामार्गाविरोधात महिलांचा लाटणे मोर्चा;

सांगली : नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, या मागणीसाठी सांगली जिल्ह्यातील विटा येथे महिलांनी लाटणे मोर्चा काढत सरकारविरोधात जोरदार आंदोलन छेडले. हातात लाटणे घेऊन महिला आणि शेतकरी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.
खानापूर तालुक्यातून प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग जाणार असून, त्यामुळे बागायती शेती उद्ध्वस्त होण्यासह शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याची भीती व्यक्त करत महिलांनी थेट रस्त्यावर उतरून आंदोलन केले. विटा तहसीलदार कार्यालयावर काढण्यात आलेल्या या लाटणे मोर्चात महिला आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मोर्चाच्या अग्रभागी ट्रॅक्टरची रांग पाहायला मिळाली, तर पथनाट्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हालगी-ताशांच्या गजरात आणि जोरदार घोषणाबाजी करत हा मोर्चा तहसीलदार कार्यालयावर धडकला. शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला.
Source link



