Uncategorized

Aditya Thackrey “अध्यक्ष खोटं बोलतायत” आदित्य ठाकरे राहुल नार्वेकरांवरच भडकले… एकनाथ शिंदे आणि फडणविसांनाही बनवलं टीकेचं लक्ष्य

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभेतील सभागृह नेते आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. मंत्र्यांना खात्याचा अभ्यास करण्याची गरज वाटत नाही. काही मंत्र्यांना स्वत:च्या खात्याची माहिती नसते. प्रश्न विचारल्यावर इतर मंत्र्यांवर जबाबदारी टाकतात काहीजण उत्तरं देतात तर काहीजण प्रश्नापासून पळ काढतात असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला.

सभागृहाच्या कामकाजावर टीका करताना आदित्य ठाकरे यांनी याआधीच्या महाविकास आघाडीच्या सरकारचा दाखला देत आमच्या काळात असे होत नव्हते “आमच्या सरकारमध्ये कोणत्याही मंत्र्याने पळवाट काढली नाही किंवा दुसऱ्यावर जबाबदारी ढकलली नाही, ज्या खात्याची जबाबदारी घेतली होती त्या मंत्र्यामध्ये उत्तरे देण्याची तयारी प्रत्येकामध्ये होती” अशी खरपूस टीका आदित्य ठाकरे यांनी केली. म्हटले.

नवीन पद्धत सुरु केली

मुख्यमंत्री फडणवीस यांचं नाव न घेता म्हटले की, “जे खातं भांडून, रडून घेतलं त्याची जबाबदारी घेण्याची तयारी दाखवावी” आदित्य ठाकरे पुढे म्हणाले मुख्यमंत्री सभागृहात बसून उत्तरे देतात इतरही काही मंत्री आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडतात मात्र काहीजणांनी इतर मंत्र्यांना आपली खाते वाटण्याची पद्धत सुरु केली आहे.

राहुल नार्वेकरांवर आदित्य ठाकरे नाराज

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना आदित्य ठाकरे यांनी विधासभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरही आरोप करत म्हटले  की, अध्यक्षांनी २०१९ आणि २०२० च्या काळात अशाच घटना घडल्याचे सांगितले, हे पूर्णपणे खोटे आहे. “२०१९ किंवा २०२० मध्ये कुठल्याही मंत्र्याने किंवा मुख्यमंत्र्याने पळ काढला नव्हता. आमचे राज्यमंत्री असतानाही त्यांनी जबाबदारीने उत्तर दिली. आम्ही जनतेचे प्रश्न विचारले आणि पूर्ण जबाबदारीने त्यांची उत्तरे दिली,” असे त्यांनी स्पष्ट केले.

आदित्य ठाकरे यांनी मागणी केली की, अध्यक्षांनी केलेले खोटे विधान रेकॉर्डवर आहे, त्यामुळे ते रेकॉर्डिंग काढून टाकावे. उगाच खुर्चीवर बसून घाणेरडे राजकारण करण्यापेक्षा सत्य स्वीकारावे, अशीही सूचना केली.

 

 


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​