भारताचा मित्र व्हाईट हाऊसमध्ये बसलाय!”

फ्रान्स -पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात समोरासमोर चर्चा सकारात्मक पद्धतीने झाली आहे. फ्रान्समध्ये ‘जी-७’ शिखर परिषदेच्या निमित्ताने ते भेटले आहेत. भारतावर अन्य देशाने हल्ला केल्यास अमेरिका भारताला सर्व साहाय्य करण्यास सज्ज आहे, असे महत्वाचे आश्वासन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मिळाले.
एव्हियन येथे बुधवारी संध्याकाळी भारतीय प्रमाणवेळेनुसार साडेसहा वाजता चर्चेचा प्रारंभझाला. चर्चा सत्तर मिनिटे चालली.दोन्ही नेत्यांची थेट भेट सोळा महिन्याने झाली आहे.
पंतप्रधान मोदी यांची प्रशंसा
नरेंद्र मोदी हे अत्यंत प्रसन्न पण कठोर चर्चापटू आहेत. त्यांचे आणि माझे संबंध अतिशय निकटचे
आहेत. त्यांचा आणि भारताचा मी नेहमी सन्मान करतो. मला भारत दौऱ्याचे आमंत्रण मिळाले असून लवकरच मी यासंबंधी निर्णय घेणार आहे, अशी भलावण अध्यक्ष ट्रम्प यांनी केली.
इराणसंबंधीही चर्चा
दोन्ही नेत्यांनी इराण आणि मध्यपूर्वेतील परिस्थिती यांच्या संदर्भातही चर्चा केली.
होर्मुझची सामुद्रधुनी वाहतुकीसाठी मुक्त राहिली पाहिजे, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. तर अध्यक्ष ट्रम्प यांनीही याला दुजोरा दिला.
नाविकांच्या मृत्यूचा मुद्दा
होर्मुझमध्ये एका वाहतूक नौकेवर झालेल्या हल्ल्यात भारताचे तीन नाविक मृत्यूमुखी पडले होते. मोदी यांनी हा मुद्दा उपस्थित केला. सागरी मार्गावर वाहतूक होत असताना, सर्व नाविकांची सुरक्षा सुनिश्चित असावी, अशी अपेक्षाव्यक्त केली.
चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेलाही संबोधित केले आहे. मी भारताचा चांगला मित्र असून भारतासंबंधी माझ्या मनात आदराची भावना आहे. त्यांचा एक मित्र आज व्हाईट हाऊसमध्ये बसला आहे. ते त्याच्यावर विश्वासठेवू शकतात, असे विधान ट्रम्प यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांना भेटून आनंद झाला आहे. दोन्ही देशांमधील व्यापार करारासंबंधीही समाधानकारक चर्चा झाली असून लवकरच अध्यक्ष ट्रम्प भारताचा दौरा करतील, असे सांगितले.
Source link



