शिंगणापूर योजनेवरच शहराची भिस्त

कोल्हापूर : शहरात थेट पाईपलाईन योजना बंद झाल्याने शनिवारपासून १ दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. दरम्यान, पंचगंगेची पाणी पातळी घटल्याने नागदेववाडी उपसा केंद्रही बंद आहे. त्यामुळे शिंगणापूर योजनेतूनच शहरात पाणी पुरवठा सुरू आहे. बुधवारी त्यातूनच अपुरा, कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्याने शहर आणि परिसरात पाण्यासाठी धावाधाव सुरू असल्याचे चित्र दिसत होते. महापालिकेच्या सभेतही पाणी प्रश्नाचे पडसाद उमटले. दरम्यान, काही भागांत टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरूवात झाली आहे.
शहर आणि परिसरात बुधवारी सकाळी काहीभागांत पाणी आलेच नाही. काही भागांत अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. परिणामी, शहरातपाण्यासाठी लाईनपाण्यासाठी सकाळपासून धावाधाव सुरू झाली. दिवसभर प्रत्येक वॉ ऊत असलेल्या कुपनलिकांवर पाण्यासाठी महिलांच्या घागरीसह रांगा लागल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी विहिरी आणि बोअरींग सुरू करून नागरिकांनी पाणी नेण्याचा प्रयत्न केला. काही अपार्टमेंटमध्ये तर वर्गणी काढून टँकर मागवले गेले. महापालिका प्रशासनानेही टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला असला तरीही पाणी संकट कायम असल्याचे चित्र पहायला मिळाले.
शहरात रंकाळा तलाव, पंचगंगा, घाटावर पाणी नेण्यासाठी नागरिक घागरी घेऊन आले. त्यांनी घागरीने पाणी सोबत आलेल्या वाहनांवरून घरी नेले. शहरातील अनेक वॉ टर एटीएम केंद्रांवर सायंकाळी पिण्याच्या पाण्यासाठी रांगा लागल्याचे पहायला मिळाले. पंचगंगा घाटावर महिलांची धुणे धुण्यासाठी गर्दी झाल्याचे दिसून आले. अगदी म्हैशी धुण्यासाठीही नदीपात्रात सोडण्यात आल्या होत्या.
पंचगंगा घाटावर मंदिरे पाहण्यासाठी गर्दीपाण्यासाठी नागरिकांची धावाधाव सुरू असताना पंचगंगा घाटावर पाणी पातळी खाली गेल्याने पात्रातील जुनी मंदिरे खुली झाली आहेत. ती पाहण्यासाठी गर्दी होत आहे. सकाळी हेरिटेज समितीच्या अध्यक्ष अमरजा निंबाळकर, उमाकांत रानिंगा आदींनी नदीपात्रातील मंदिरांची पाहणी केली.
Source link



