Uncategorized

Radhika in ‘Lust Stories 3’

ऑडिशनसाठी रांगेत उभे राहण्यास तयार

राधिका मदान ‘सूबेदार’ या चित्रपटातील स्वत:च्या प्रभावी अभिनयामुळे सध्या  कौतुकाची धनी ठरली आहे. आता राधिका ही शकुन बत्रा यांच्या ‘लस्ट स्टोरीज 3’साठी पूर्णपणे तयार असून यात ती अली फजलसोबत दिसून येणार आहे.

शकुन बत्रा यांच्या कामाची मी अत्यंत मोठी चाहती राहिली आहे. त्यांच्या चित्रपटाविषयी कळल्यावर मी ‘लस्ट स्टोरीज 3’साठी ऑडिशन देण्याची विनंती केली. देवाच्या कृपेमुळे मला ही संधी मिळाली. मी एक सरासरी अभिनय करण्याची जोखीम पत्करू शकत नाही. प्रत्येक भूमिकेसाठी अनेक लोक रांगेत उभे असतात. जर मी चांगला अभिनय सादर न केल्यास मला पुणीच दुसरी संधी देणार नाही. माझ्यासाठी प्रत्येक काम ‘करो या मरो’सारखे असते. या क्षेत्रात टिकायचे असल्यास मला दरवेळी सर्वोत्तम द्यावे लागणार असल्याचे उद्गार राधिकाने काढले आहेत.

ऑडिशनसाठी मी रांगेत उभी राहिली आहे, अत्यंत मेहनत केली आहे. लोक मला कास्ट करण्याविषयी विचार करत नसल्यास मी स्वत: ऑडिशन मागते आणि यात मला कुठलाच कमीपणा वाटत नाही. ऑडिशनची संधीच न मिळाल्यास आणि केवळ माझ्या आडनावामुळे मला नाकारण्यात आल्यास त्रास होतो. जर मी ऑडिशन देऊन रिजेक्ट झाली तर वाईट वाटत नाही. याकरता मला पुन्हा रांगेत उभे रहावे लागले तरीही माझी तयारी आहे. मी एक कलाकार आहे आणि स्वत:च्या स्वप्नांसाठी काहीही करण्यास तयार असल्याचे राधिकाचे सांगणे आहे.

 


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​