Woman unable to sleep with eyes closed for six years.

चीनच्या एका महिलेच्या डबल आयलिड सर्जरीत झालेल्या गंभीर चुकीमुळे तिचे जीवनच बदलून गेले आहे. 2020मध्ये करविण्यात आलेल्या कॉस्मेटिक सर्जरीनंतर तिच्या टियर ग्लँडमध्ये अडचणी आल्या आणि पापण्या योग्यप्रकारे बंद होणे बंदच झाले. ती मागील 6 वर्षांपासून डोळे पूर्णपणे बंद न करताच झोपत आहे आणि सतत अश्रू वाहण्याच्या समस्येला तोंड देत आहे.
सर्जरी करणाऱ्या महिलेकडे डॉक्टरचा परवाना नव्हता आणि क्लीनिकही नियमांनुसार संचालित होत नव्हते असे चौकशीत कळले. यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहाचले आणि भरपाईवरून दीर्घ कायदेशीर लढाई चालली. ही घटना कॉस्मेटिक सर्जरी करविण्यापूर्वी डॉक्टर आणि क्लीनिकबद्दल पूर्ण पडताळणी करण्याचा महत्त्वपूर्ण इशारा देते.
सुंदर दिसण्याची इच्छा नडली
चीनमधील या महिलेची सुंदर दिसण्याची इच्छाच जीवनातील सर्वात मोठी समस्या ठरली आडहे. पूर्व चीनमध्ये राहणाऱ्या वांग या महिलेने 2020मध्ये डबल आयलिड सर्जरी करविली होती, परंतु सर्जरी चुकीची झाल्याने ती पूर्णपणे डोळे बंद करू शकत नाही. इतकेच नाही तर तिच्या डोळ्यांमधून सातत्याने अश्रू वाहत राहतात आणि तिला अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अहवालानुसार वांगने जियांग्सू प्रांताच्या सूझोउ शहरातील एका कॉस्मेटिक क्लीनिकमध्ये सुमारे 12 हजार युआन (जवळपास 1.4 लाख रुपये) खर्च करून ही सर्जरी करविली होती. तर सर्जरी करणाऱ्या महिलेकडे डॉक्टर म्हणून कुठलाच वैध परवाना नव्हता असे नंतर कळले.
काही तासांनीच बिघडली स्थिती
सर्जरीच्या काही तासांनीच वांगची प्रकृती बिघडू लागली. तिच्या डोळ्यांमध्ये तीव्र वेदना सुरू झाल्या, पापण्यांचा आकार बिघडला आणि डोळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात द्रवपदार्थ जमा झाला. स्थिती गंभीर झाल्यावर तिला त्वरित एका मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्जरी करणाऱ्या महिलेशी संपर्क साधला असता तिने काही दिवसांमध्ये सर्वकाही ठीक होईल असा विश्वास दिला. परंतु नंतर ती महिला फोनही उचलत नव्हती. सर्जरीदरम्यान वांगच्या टियर ग्लँडला नुकसान पोहोचल्याचे आणि पापण्यांवरही चुकीच्या पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे डॉक्टरांना आढळून आले.
निष्काळजीपणा उघड
समस्या ठीक करण्यासाटी वांगला पुन्हा शस्त्रक्रिया करवून घ्यावी लागली, परंतु तरीही तिचे डोळे पूर्णपणे बंद होऊ शकले नाहीत. तिला झोपतेवेळीही डोळे उघडे ठेवून झोपावे लागते. सतत अश्रू वाहत असल्याने तिचे सामान्य जीवन ही प्रभावित झाले आहे. 2022 मध्ये वैद्यकीय तपासणीनंतर तिच्या स्थितीला दिव्यांगत्वाच्या 9 व्या श्रेणीत ठेवण्यात आले. ज्या क्लीनिकमध्ये सर्जरी झाली होती, त्याकडे आवश्यक व्यावसायिक परवानाही नव्हता असे चौकशीत उघड झाले. काही महिन्यांनी ते क्लीनिकही बंद झाले.
न्यायालयात पोहोचले प्रकरण
या घटनेने माझे पूर्ण जीवन बदलले. लोकांना भेटणे मी टाळू लागले, यामुळे नैराश्य आणि अनिद्रा यासारख्या समस्यांची शिकार ठरल्याचे वांग यांचे सांगणे आहे. वांग यांनी सर्जरी करणाऱ्या महिलेच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल केला. दोन्ही बाजूंदरम्यान नंतर तडजोड झाली, ज्याच्या अंतर्गत वांग यांना सुमारे 1 कोटी रुपयांची भरपाई मिळाली. याच्या बदल्यात याप्रकरणाशी निगडित सर्व सोशल मीडिया पोस्ट हटविणे आणि भविष्यात या विषयावर सार्वजनिक स्वरुपात टिप्पणी न करण्याची अट तिला मानावी लागली. परंतु नंतर हा वाद पुन्हा वाढला. दोन्ही बाजूंनी परस्परांवर आरोप केले आणि प्रकरण पुन्हा न्यायालयात पोहोचले. अखेरीस न्यायालयाने वांग यांना कराराच्या अटीनुसार काही रक्कम परत करण्याचा आदेश दिला. आता वांग सोशल मीडियाद्वारे लोकांना कुठल्याही कॉस्मेटिक सर्जरीपूर्वी डॉक्टर आणि क्लीनिकची पूर्ण पडताळणी करण्याचा इशारा देत आहे. एक चुकीचा निर्णय जीवनभरासाठी पश्चातापाचे कारण ठरू शकतो से तिचे सांगणे आहे.
Source link


