Uncategorized

Argentina and Portugal victorious in warm-up matches.

वृत्तसंस्था, काईल फिल्ड (टेक्सास)

2026 च्या फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेला 12 जूनपासून प्रारंभ होत आहे. फुटबॉलचा हा कुंभमेळा अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको यांच्या संयुक्त यजमानपदाने भरविला जात आहे. या स्पर्धेपूर्वी खेळविण्यात आलेल्या सरावाच्या सामन्यामध्ये अर्जेंटिना आणि पोर्तुगाल या दोन बलाढ्या संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजयी मिळविले.

सरावाच्या सामन्यात विद्यमान विश्वकरंडक विजेता अर्जेंटिनाने होंडुरासचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात अर्जेंटिनातर्फे लॉटेरो मार्टिनेझ आणि सिमोनी यांनी प्रत्येकी 1 गोल केला. या सामन्यात अर्जेंटिनाचा हुकमी खेळाडू लायोनेल मेस्सी स्नायू दुखापतीमुळे खेळू शकला नाही. आता अर्जेंटिनाचा दुसरा सरावाचा सामना आईसलँड बरोबर 9 जून रोजी होणार आहे. तर फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील अर्जेंटिनाचा सलामीचा सामना 16 जूनला अल्जेरियाबरोबर खेळविला जाणार आहे.

दुसऱ्या सरावाच्या सामन्यात पोर्तुगालने चिलीचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला. पोर्तुगालतर्फे ब्रुनो फर्नांडीस आणि गोनकालो ग्युडेस यांनी प्रत्येकी 1 गोल केला. या सामन्यात पूर्वार्धात ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपला सहभाग दर्शविला होता. पण उत्तरार्धात त्याने विश्रांती घेतल्याने त्याच्या जागी मार्टिनेझला मैदानात उतरविण्यात आले. 58 व्या मिनिटाला ग्युडेसने पोर्तुगालचे खाते उघडले तर ब्रुनो फर्नांडीसने पोर्तुगालचा दुसरा गोल 75 व्या मिनिटाला नोंदविला.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​