Uncategorized

चांदोली परिसरात गव्यांचा उच्छाद

 

वारणावती : चांदोली परिसरातीलमणदूर येथील वारणावती वसाहतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून गव्यांचा वावर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. तीव्र उन्हाळा आणि जंगलातील पाण्याच्या टंचाईमुळे हे गवे आता थेट मानवी वस्तीत शिरू लागल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मात्र, वनविभाग गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून केला जात आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प चांदोली परिसर वन्यजीवांसाठी राखीव असला, तरी सध्या जंगलातील पाण्याचे स्त्रोत आटल्याने वन्यप्राणी पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. अन्न आणि पाण्याच्या शोधार्थ हे अवाढव्य गवे थेट बारणावती बसाहतीमधील घरांच्या आसपास आणि शेतांमध्ये मुक्तपणे वावरत आहेत. यामुळे शेतकरी, मजूर आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

संध्याकाळच्या वेळी घराबाहेर पडणेही नागरिकांसाठी कठीण झाले आहे. वारणावती बसाहतीमधील नागरिकांनी वनविभागाकडे तातडीने गब्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. वनविभागाने परिसरात गस्त वाढवावी, गब्यांना जंगलात हुसकावून लावण्यासाठी उपाययोजना कराव्यात आणि न्यायालयाच्या आदेशाचा मान राखावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही परिसरातील संतप्त नागरिकांनी दिला.

गवे रोज बसाहतीत तसेच मणदूर गावात येत असल्यामुळे जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. वनविभागाला बारंबार कळूनही ते ठोस कारवाई करायला तयार नाहीत. उद्या जर एखादी मोठी दुर्घटना घडली, तर त्याला जबाबदार कोण असा सवाल विचारला जात आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाला हरताळ बन्यजीव आणि मानवी संघर्ष टाळण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण आदेश दिले होते. वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीतील प्रवेश रोखण्यासाठी वनविभागाने विद्यार्थी व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या. मात्र, सद्यस्थिती पाहता वनविभागाच्या ढिसाळ कारभारामुळे या आदेशाला पूर्णपणे हरताळ फासला गेल्याचे चित्र दिसत आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​