Uncategorized

वाघबीळ येथे मध्यरात्री हुल्लडबाजी

                                       वाघबीळ येथे मध्यरात्री हुल्लडबाजी

वारणानगर : कोल्हापूर-रत्नागिरी राज्य महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास बेकायदेशीर जमाव जमवून, वाघबीळ जवळ चंद्रदीप पेट्रोल पंपासमोर हुल्लडबाजी करणाऱ्या १८ तरुणांसह १९ विधीसंघर्षग्रस्त बालकांवर कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या कारवाईत तब्बल २३ लाख ४५ हजार रुपये किमतीची ४९ वाहने जप्त केली आहेत. याशिवाय अल्पवयीन मुलांना बेकायदेशीररित्या वाहन चालवण्यास दिल्याप्रकरणी त्यांच्या पालकांवर आणि मित्रांवरही गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी दिलेल्यामाहितीनुसार, ही घटना दि.६ जून रोजी मध्यरात्री १२:३० वाजण्याच्या सुमारास वाघबीळ दाणेवाडी (ता. पन्हाळा) येथील ‘चंद्रदीप पेट्रोल पंप’ परिसरात घडली.शाहूवाडी विभागाचे पोलीस उपअधिक्षक आप्पासो पवार सहकाऱ्यांसह रात्री गस्त घालताना हा प्रकार निर्देशनास आला. या ठिकाणी आरोपी आणि विधीसंघर्षग्रस्त बालकांनी एकत्र येत मोठ्या आवाजात वाहने रेस केली. बेदरकारपणे गाड्या चालवून हुल्लडबाजी केली आणि महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण करून जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले आहे.

याप्रकरणी कोडोली पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक संदिप दिलीप पाटील यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली. त्यानंतर ६ जून रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहितेसह ‘मोटार वाहन कायद्या नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संशयितांना ताब्यात घेऊन नोटीस देऊन त्यांना सोडण्यात आले.

एकूण ३७ आरोपींवर गुन्हा दाखल या कारवाईत कोल्हापूर, सांगलीपोलिसांनी घटनास्थळावरून वेगवेगळ्या कंपन्यांच्या एकूण ४९ दुचाकी जप्त केल्या असून त्यांची अंदाजे किंमत २३,४५,००० रुपये आहे. विधी संघर्षग्रस्त बालकांना बेकायदेशीररित्या गाड्या चालवायला दिल्याबद्दल त्यांच्या पालकांना आणि मित्रांनाही या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील तरुणांवर गुन्हा दाखल झाला आहे. कोल्हापूर शहर वपरिसर रेहान शकील शेख (वय १८, क. बावडा), राहुल लहू गावडे (वय ३४, शिवाजी पेठ), श्रीकांत तुकाराम कांबळे (वय ३०, शिये), संतोष सुधाकर कोकाटे (वय २०, क. बावडा), निलेश मोहन कांबळे (वय १९, क. बावडा), प्रशिल सतिश सावंत (वय १९, क. बावडा), आर्यन अजय जाधव (वय १८, क. बावडा). पन्हाळा तालुका : अर्थव सतिष राउत (वय १८, वारणानगर), आदर्श शिवाजी चोपडे वय २०, माले. हातकणंगले तालुका : पार्थ विलास भोबसकर (वय १९, नागाव), संकेत उत्तम पाटील (वय २०, पाडळी), आदर्श महादेव पाटील (वय १८, नवेपारगाव). करवीर तालुका : सक्षम संतोष वळीगड्डे वय १९, हळदी कांडगाव, अभिषेक बळवंत जौदाळ (वय १८, वडणगे, केदार प्रकाश काळे वय १८, वडणगे. सांगली जिल्हा: राजवर्धन शिवाजीचव्हाण वय १८, चिकुर्डे, वाळवा, पृथ्वीराज कुमार माने (वय २०, ईश्वरपूर, वाळवा), राहूल लक्ष्मण पुजारी (वय २२, ऐतवडे खुर्द, वाळवा). यांच्यासोबतच कोल्हापूर, कदमवाडी, क. बावडा, पन्हाळा, वडिणगे, आणि हुपरी परिसरातील १९ अल्पवयीन (विधी संघर्षग्रस्त बालकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शाहूवाडी विभागाचे उपअधिक्षक आप्पासो पवार, कोडोली पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याची नोंद पोलीस हेड कॉन्स्टेबल परीट यांनी केली असून, पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मपोसई देवकते करत आहेत. पोलीस


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​