Uncategorized

खैरनारेच्या कोठडीत 15 जूनपर्यंत वाढ

नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू न्यायालयाने नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शुभम खैरनारे याच्या न्यायालयीन कोठडीला 15 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापूर्वीची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर शनिवारी शुभम खैरनारेला न्यायालयात हजर करण्यात आले होते. दरम्यान, याच प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मनीषा वाघमारे यांच्या जामीन अर्जावरील निर्णय न्यायालयाने 9 जूनपर्यंत राखून ठेवला आहे. सीबीआयने मनीषा वाघमारे यांना कटातील संशयित ठरवत त्यांच्या जामीन अर्जाला विरोध केला आहे. वाघमारे यांनी फुटलेली प्रश्नपत्रिका मिळवून ती इतरांपर्यंत पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावा तपास यंत्रणांकडून केला जात आहे. नीट परीक्षा 3 मे रोजी झाली होती, परंतु पेपरफुटीनंतर 12 मे रोजी ती रद्द करण्यात आली होती. आता ही परीक्षा 21 जून रोजी पुन्हा आयोजित करण्यात आली आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​