Uncategorized

नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत प्रज्ञानंद विजेता

शेवटच्या फेरीत कीमरचा पराभव, स्पर्धेचे जेतेपद मिळविणारा पहिला भारतीय खेळाडू

ओस्लो, वृत्तसंस्था

ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याने जर्मनीच्या व्हिन्सेंट कीमरचा शेवटच्या फेरीत पराभव करून प्रतिष्ठित ‘नॉर्वे बुद्धिबळ’ स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू म्हणून इतिहासात आपले नाव कोरले आणि आपल्या शानदार कामगिरीचा दिमाखदार शेवट केला.

शेवटच्या फेरीच्या सुऊवातीला 15 गुणांसह दुसऱ्या स्थानावर असलेल्या प्रज्ञानंदने निर्णायक क्षणी उत्कृष्ट खेळ केला. त्याने ’क्लासिकल’ प्रकारात विजय मिळवून तीन पूर्ण गुण कमावले आणि एकूण 18 गुणांसह अव्वल दर्जाच्या बुद्धिबळ स्पर्धांमधील अत्यंत प्रतिष्ठित मानला जाणारा हा चषक आपल्या नावे केला. या कामगिरीसह, चेन्नईच्या या 20 वर्षीय खेळाडूने अशी एक किमया साधली जी 2013 मध्ये ही स्पर्धा सुरू झाल्यापासून भारताचे दिग्गज खेळाडू विश्वनाथन आनंद आणि विद्यमान जागतिक विजेता डी. गुकेश यांच्यासारख्या खेळाडूंनाही जमलेली नाही.

‘नॉर्वे चेस’ स्पर्धेत केवळ दुसऱ्यांदाच सहभागी झालेल्या प्रज्ञानंदची सुऊवात संथ होती, मात्र स्पर्धेच्या उत्तरार्धात त्याने वेग पकडला आणि सलग चार विजय मिळवले. त्याच्या या स्पर्धेतील प्रवासाचे मुख्य वैशिष्ट्या म्हणजे त्याने ‘नॉर्वे चेस’चा सात वेळचा विजेता आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या मॅग्नस कार्लसनचा ‘क्लासिकल’ बुद्धिबळ प्रकारात दोनदा पराभव केला. ही एक दुर्मिळ कामगिरी होती, जिने या वर्षाच्या सुऊवातीला झालेल्या कँडिडेट्स स्पर्धेमधील निराशाजनक कामगिरीनंतर पुन्हा जोमाने मुसंडी मारण्याचा त्याचा निर्धार दाखवला.

स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात विद्यमान जागतिक विजेता गुकेश शर्यतीतून बाहेर पडला असताना प्रज्ञानंदने भारताचे आव्हान जिवंत ठेवले आणि अखेरीस विजेतेपद पटकावले. शेवटच्या फेरीपूर्वी 15.5 गुणांसह गुणतालिकेत आघाडीवर असलेला अमेरिकन ग्रँडमास्टर वेस्ली सो याला अलीरेझा फिरौझाविऊद्धच्या ‘क्लासिकल’ सामन्यात बरोबरीवर समाधान मानावे लागल्यामुळे हा निकाल शक्य झाला. या बरोबरीमुळे त्यांचा सामना आर्मागेडन’ टायब्रेकरमध्ये गेला. या निकालामुळे प्रज्ञानंदसाठी संधी निर्माण झाली. त्याला माहित होते की, कीमरविऊद्ध ‘क्लासिकल’ प्रकारात विजय मिळवल्यास तो गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचेल आणि ऐतिहासिक विजेतेपद निश्चित करेल.

जरी वेस्ली सो याने आर्मागेडन’ टायब्रेकर जिंकला, तरी त्या विजयासाठी त्याला केवळ 1.5 गुण मिळाले. यामुळे त्याची एकूण गुणसंख्या 17 झाली, जी प्रज्ञानंदच्या 18 गुणांच्या विजयी आकड्यापेक्षा एकने कमी होती. शेवटच्या फेरीत विजेतेपदाच्या आशेने उतरलेल्या अलीरेझाने 15.5 गुणांसह तिसरे स्थान मिळवले. दुसरीकडे, गुकेशची निराशाजनक कामगिरी सुरूच राहिली. शेवटच्या फेरीत पांढरे मोहरे घेऊन खेळताना कार्लसनने 20 वर्षीय भारतीय खेळाडूचा ‘क्लासिकल’ सामन्यात पराभव केला आणि तीन पूर्ण गुण मिळवले. मात्र हा विजय त्याला विजेतेपदाच्या शर्यतीत आणण्यासाठी पुरेसा ठरला नाही. कारण 13 गुणांसह कार्लसन गुणतालिकेत पाचव्या स्थानावर राहिला.

आईचे भाकीत ठरले खरे

‘मला वाटते की, हा माझ्या कारकिर्दीतील सर्वांत मोठा विजय आहे. सरासरी रेटिंगच्या दृष्टीनेही हा अधिक सरस आहे. कारण ‘विज्क आन झी’मध्ये (टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा) 2600 रेटिंग असलेले काही खेळाडू असतात, पण येथे मात्र केवळ अव्वल दर्जाचे खेळाडूच होते’, असे प्रज्ञानंदने नंतर सांगितले. ‘1 जून रोजी, अलीरेझाविऊद्धच्या सामन्यापूर्वी मी माझ्या आईशी बोलत होतो त्यावेळी ती मला म्हणाली, हा नवीन महिना आहे, तू नक्कीच चांगली कामगिरी करशील. आई नेहमीच अशा गोष्टी सांगत असते. पण त्यानंतर मी ते चारही सामने जिंकलो. मला वाटते तिला काही तरी नक्कीच जाणवले होते’, असेही तो म्हणाला.

अविश्वसनीय कामगिरी : पंतप्रधान मोदी

‘नॉर्वे चेस’ स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आर. प्रज्ञानंद याचे अभिनंदन केले. ‘या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रज्ञानंदचे अभिनंदन. ही खरोखरच एक अविश्वसनीय कामगिरी आहे, जी त्याच्या सातत्यपूर्ण उत्कृष्टतेचे दर्शन घडवते. त्याच्या पुढील वाटचालीस माझ्या शुभेच्छा’, असे मोदींनी ’एक्स’वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे. याशिवाय गृहमंत्री अमित शहा, तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनीही त्याचे अभिनंदन केले.

 


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​