भारत – अफगाणिस्तान कसोटी सामना आजपासून

जडेजाचा उत्तराधिकारी शोधण्याचे भारतासमोर आव्हान
त. भा. प्रतिनिधी
मुल्लानपूर : अलीकडच्या काळात मायदेशातील कसोटी सामन्यांमधील खराब कामगिरीचे दडपण असले, तरीही एक तगडा संघ म्हणून ओळखला जाणारा भारत आता जिगरबाज अफगाणिस्तानविऊद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात उतरणार आहे. आज शनिवारपासून सुरू होणाऱ्या या सामन्यामुळे यजमान संघाला खेळाडूंचे योग्य संतुलन शोधण्यास मदत होऊ शकते.
2018 मध्ये, भारताविऊद्धच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दुपारच्या जेवणानंतर आणि चहापानापूर्वीच्या सत्रात अफगाणिस्तानने 10 बळी गमावले होते. त्यानंतर चहापानानंतर आणि दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी उर्वरित 10 बळी पडले. पण यंदा हशमतुल्ला शाहिदीला आपल्या संघाकडून चांगली लढत देण्याची अपेक्षा असेल. कारण भारतीय संघ सध्या बदलाच्या कठीण टप्प्यातून जात आहे आणि या सामन्यात विविध रचनांचा प्रयोग करण्याच्या तयारीत आहे. तरीही गेल्या वर्षी उत्तम तयारी करून आलेल्या दक्षिण आफ्रिकेकडून मिळालेला 0-2 असा दाऊण पराभव भारतीय खेळाडू विसरलेले नसतील. त्यामुळे अनुभवात मोठी तफावत असूनही प्रतिस्पर्ध्याला हलक्यात न घेणेच त्यांच्या हिताचे ठरेल.
ऑगस्टमध्ये श्रीलंकेविऊद्ध होणाऱ्या दोन सामन्यांच्या महत्त्वाच्या कसोटी मालिकेपूर्वी लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर स्थिर फलंदाज आणि रवींद्र जडेजाचा उत्तराधिकारी शोधणे ही मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार शुभमन गिल यांच्यासमोरील दोन महत्त्वाची आव्हाने आहेत. यासाठी साई सुदर्शन आणि शैलीदार फलंदाज देवदत्त पडिक्कल यांच्यातून निवड करायची आहे. गंभीर यांनी शुक्रवारी स्पष्ट केले की सुदर्शनलाच कायम ठेवले जाईल. कारण त्याला योग्य संधी मिळायला हवी असे त्यांचे मत आहे.
या सामन्यासाठी रवींद्र जडेजाला विश्रांती देण्यात आली आहे, परंतु भारतीय निवड समिती व संघ व्यवस्थापन राजकोटच्या या अष्टपैलू खेळाडूच्या निवृत्तीनंतर ती जागा भरून काढण्याकरिता पर्यायांचा शोध घेत आहेत ही वस्तुस्थिती आहे. या शोधाचे कारण म्हणजे त्याची गोलंदाजी पूर्वीसारखी प्रभावी राहिलेली नाही आणि संघ व्यवस्थापनाला अपेक्षित असलेली धार त्यात दिसत नाही. परदेशातील परिस्थितीत कसोटी सामन्यांमधील त्याची फलंदाजी ही अजूनही त्याची सर्वांत मोठी जमेची बाजू आहे. त्यामुळे त्याला अजूनही काहीसा दिलासा मिळाला आहे.
तरीही भारतीय क्रिकेटने राजस्थानचा डावखुरा फिरकी गोलंदाज मानव सुतार आणि विदर्भाचा खेळाडू हर्ष दुबे अशा दोन संभाव्य उत्तराधिकाऱ्यांची निवड केली आहे. गेल्या काही दिवसांतील सराव सत्रांवरून असे दिसते की, सुतारची गोलंदाजीची शैली अधिक पारंपरिक आहे. दुसरीकडे, दुबे हा अधिक बचावात्मक गोलंदाज वाटतो. त्यांच्यापैकी एकाची निवड करणे हे कठीण असेल आणि त्यावरून संघ व्यवस्थापनाच्या रणनीतिक दृष्टिकोनाची कल्पना येईल.
दोन्ही संघांमधील तफावत आकडेवारी पाहिल्यावर अधिक स्पष्ट होते. 2018 मध्ये बेंगळूर येथे भारतासोबत झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर (जो यजमान भारताने अवघ्या दोन दिवसांत जिंकला होता) अफगाणिस्तान आतापर्यंत आणखी 11 सामने खेळला आहे. याच काळात भारत 67 कसोटी सामने खेळला आहे. 2018 च्या संघातील केवळ के. एल. राहुल सध्याच्या भारतीय कसोटी संघाचा भाग आहे, तर अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदी आणि फलंदाज रहमत शाह हे त्या सामन्यात खेळलेले खेळाडू सध्याच्या संघात आहेत. शाहिदीच्या संघाने अफगाणिस्तानमधील जलालाबाद येथे सराव शिबिर घेतले होते, परंतु केवळ सरावामुळे संघ कसोटी सामन्यासाठी पूर्णपणे तयार होऊ शकत नाही.
जून महिन्यातील उत्तर भारतातील प्रचंड उष्णता पाहता हा सामना दोन्ही संघांसाठी अयोग्य वेळी आयोजित केल्यासारखा वाटतो. तसेच, हा सामना दोन महिने चाललेल्या आयपीएलनंतर आणि इंग्लंडचा महिनाभर चालणारा दौरा यांच्या मधल्या काळात होत आहे.
संघ : भारत-शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, के. एल. राहुल (उपकर्णधार), साई सुदर्शन, रिषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रे•ाr, हर्ष दुबे, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, मानव सुतार, ध्रुव जुरेल, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल.
अफगाणिस्तान : हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अब्दुल मलिक, रहमानउल्ला गुरबाज, रहमानउल्ला, अफसर झझाई, इकराम अलीखिल, सेदीकुल्ला अटल, रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझाई, शराफुद्दीन अश्रफ, नांगेयालिया खरोटे, बिलाल सामी, कैस अहमद, मोहम्मद सलीम, झियाउर रहमान.
सामन्याची वेळ : सकाळी 9.30 वा
Source link



