Uncategorized

सफरचंद खाण्याचे 5 जबरदस्त फायदे; जाणून घ्या

सफरचंद हे दिसायला आकर्षक आणि चवीला आंबट-गोड असणारे एक ‘थंड हवेच्या प्रदेशातील’ फळ आहे. वैज्ञानिक भाषेत याला ‘फॉल्स फ्रूट’ किंवा प्रकारातील फळ म्हणतात, कारण याचा गर फुलाच्या खालच्या भागापासून तयार होतो. पण तुम्हाला माहिती आहे का या लाल मटुर फळाचे फायदे देखील आहेत… चला तर मग जाणुन घेऊया याचे फायदे…

 

१. वजन नियंत्रणात राहते -सफरचंदात फायबर आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते. ते खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते आणि लवकर भूक लागत नाही. त्यामुळे नको असलेले कॅलरीज खाणे टाळले जाते.

२. हृदयासाठी फायदेशीर –यात ‘पेक्टिन’ (Pectin) नावाचे विरघळणारे फायबर असते, जे शरीरातील खराब कोलेस्टेरॉल (LDL) कमी करण्यास मदत करते. तसेच यातील पॉलिफेनॉल रक्तदाब (BP) नियंत्रणात ठेवतात.

३. पचनशक्ती सुधारते – सफरचंदातील फायबर आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियासाठी अन्नाचे काम करते. यामुळे बद्धकोष्टता (Constipation) आणि गॅसचा त्रास कमी होऊन पचनक्रिया मजबूत होते.

४. मधुमेहाचा धोका कमी होतो -अनेक संशोधनानुसार, रोज सफरचंद खाल्ल्याने टाईप-२ मधुमेहाचा धोका कमी होतो. यातील अँटी-ऑक्सिडंट्स रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू देत नाहीत.

5 .त्वचा तजेलदार होते –यात असणारे अँटी-ऑक्सिडंट्स शरीरातील पेशींचे नुकसान होण्यापासून वाचवतात. त्यामुळे चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या येत नाहीत आणि त्वचा निरोगी राहते.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​