Kolhapur Rain Update | उन्हाच्या झळांनंतर पावसाच्या सरी; कोल्हापुरात सायंकाळी जोरदार पाऊस, वातावरणात गारवा

प्रखर उन्हानंतर शहराला गारव्याचा दिलासा
कोल्हापूर : गेल्या आठवडाभरापासून शहरात उष्णतेची तीव्र लाट अनुभवायला मिळत होती. दुपारच्या बेळेत तापमानाने तब्बल ३८ ते ४० अंश सेल्सिअसचा टप्पा गाठल्याने नागरिक हैराण झाले होते. कडक उन्हामुळे रस्त्यांवर दुपारच्या सुमारास शुकशुकाट पाहायला मिळत होता. उष्ण व दमट वातावरणामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. विशेषत लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.
बुधवारीही सकाळपासूनच उन्हाच्या झळा तीव्र होत्या. दुपारपर्यंत प्रखर ऊन कायम असल्याने नागरिकांनीघराबाहेर पडणे टाळले. अनेक ठिकाणी थंड पेयांची दुकाने आणि आइस्क्रीम पार्लरवर गर्दी दिसून आली. उकाड्यामुळे बीज वापरातही मोठी वाढ झाली होती. मात्र सायंकाळनंतरअचानक बातावरणात बदल होण्यास सुरुवात झाली. आकाशात ढग दाटून आले आणि काही वेळातच शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली. वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे बाताबरणात गारवा निर्माण झाला. गेल्या अनेक दिवसांपासून उष्णतेने त्रस्त झालेल्या नागरिकांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला. पावसामुळे शहरातील तापमानातही झाली.
Source link



