Uncategorized

Sangli News | आजोळी सुट्टीचा आनंद बनला शेवटचा प्रवास! टोणेवाडीत खेळता खेळता चिमुरड्यासोबत नक्की काय घडलं?

                                   खेळताना शेततळ्यात बुडून चिमुरड्याचा मृत्यू

उमदी : टोणेवाडी तालुकाजत येथे उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आजोळी आलेल्या दोन चिमुरड्यांवर काळाने घाला घातला. टोणेवाडी येथील एका शेततळ्यात पडल्याने श्लोक अमोल घेरडे (वय ७ वर्षे) या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याचा भाऊ श्रेयस घेरडे हा गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्लोक आणि श्रेयस हे आपल्या आईसोबत जत तालुक्यातील टोणेवाडी येथे आजोळी सुट्टीसाठी आले होते.आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास खेळता खेळता ही दोन्ही मुले शेतातील शेततळ्याजवळ गेली होती. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही शेततळ्यातपहले. ही बाब लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन दोघांना बाहेर काढले.

एकुलता एक आधार आणि सैनिकाचे कुटुंब
दुर्दैवाने, श्लोकचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. श्रेयसची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण टोणेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.
मुलांचे वडील अमोल शंकर घेरडे हे भारतीय सैन्य दलात कार्यरत असून सध्या ते जम्मू-काश्मीर येथे देशसेवा बजावत आहेत. आपल्या लाडक्या मुलांच्या बाबतीत घडलेल्या या घटनेमुळे घेरडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान या दुघर्टनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​