Uncategorized
Ratnagiri Khed accident: खवटीजवळ अपघात; चौघे जण जखमी

दहिसरमधील एकाच कुटुंबातील चौघे जखमी
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील खवटी रेल्वे पुलाजवळ शुक्रवारी सकाळी ११.५० वाजण्याच्या सुमारास टेम्पो ट्रॅव्हल्सला झालेल्या अपघातात चौघेजण जखमी झाले.
सामाजिक कार्यकर्ते सुरज हंबीर यांनी जखमींना उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. अनु विनायक कोलमकर (३८), त्रिशा अनिल सिंग (८), गुंजन अनिल सिंग (११), अनिल श्रीशंकर सिंग (३८, सर्व रा. दहिसर-मुंबई) अशी जखमींची नावे आहेत.
टेम्पो ट्रॅव्हल्स मुंबई येथून गणपतीपुळे येथे जात होता. चालकांचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडला. अपघातामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प झाली. अपघाताची माहिती मिळताच कशेडी येथील वाहतूक पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमींना मदतकार्य केले.
Source link



