Pandharpur News | पंढरपुरात ‘काळ्या मैने’ची एन्ट्री! रानमेव्याच्या हाळ्यांनी बाजारपेठ आणि मुख्य रस्ते दुमदुमले

पंढरपुरात ‘काळी मैना’ करवंदांचा हंगाम फुलला
पंढरपूर – ‘काळी-काळी मैना….डोंगराची मैना’ अशा हाळ्या सध्या पंढरपुरातील बाजारपेठ, उपनगरे आणि मुख्य रस्त्यांवर घुमू लागल्या आहेत. चवीला तुरटो आणि गोड असणारी ही लहान करवंदे भाविक व नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. गेल्या १५ दिवसांपासून पहणाऱ्या वळवाच्या पावसामुळे हा रानमेवा परिपक्व झाला आहे. त्यामुळे काळ्या मैनांनी भरलेली टोपली घेऊन हातगाड्यांवर विक्री करणाऱ्या महिला आणि पुरुषांचे प्रमाण शहरात वाढले आहे.
सध्या करवंदांसोबत जांभूळ, कोकणी मेव्याची वाढणार आवकगेल्या काही दिवसांपासून पंढरपूरच्या फळ बाजारात कोकणातून करवंदांची आवक सुरू झाली आहे. सावंतवाडी, महाड, रत्नागिरी आणि कणकवली परिसरातून हा रानमेवा बाजारात येत आहे. शहरातील मोजक्याच व्यापाऱ्यांकडे करवंदे उपलब्ध असली तरी येत्या काळात ही आवक आणखी वाढणार आहे.मे महिन्याच्या मध्यवर्ती काळात करवंदांसोबत जांभूळ आणि इतर कोकणी मेव्याची आवकही वाढेल.
शाळांना उन्हाळी सुटी असल्याने मुलांसह आबालवृद्ध ही ‘काळी मैना खरेदी करण्यासाठी आकर्षित होत आहेत.पंढरपूर शहर आणि तालुक्यात मार्च अखेर व एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून जंगलचा रानमेवा म्हणून प्रसिद्ध असणारी करवंदे, जांभळे यांचा बहर सुरू होतो.
रानमेवा खाण्यासाठी मुलांसह आबालवृद्धांची धडपड सुरू असते. याच दरम्यान विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात पर्यटकांची आणि भाविकांची मोठी गर्दी वाढलेली असते. विठुरायाच्या दर्शनासाठी आलेले हे भाविक आवर्जुन या ‘काळ्या मैनेचा’ आणि रानमेव्याचा मनमुराद आनंद लुटत असतात.
Source link



