Uncategorized

Kolhapur Crime | कोल्हापुरात उंबराच्या फांदीवरून दोन कुटुंबांत थरार; सत्तूर आणि कोयत्याने एकमेकांवर हल्ला

                             फुलेवाडी रिंगरोडवर दोन गट भिडले, दोघे जखमी

कोल्हापूर -उंबराच्या झाडाची फांदी तोडल्याच्या कारणावरुन फुलेवाडी रिंगरोड येथे दोन कुटुंबात हाणामारी झाली. यामध्ये सत्तूर, कोयत्याने एकमेकांवर – हल्ला केल्याने दोघेजण जखमी झाले. अमर अशोक जाधव (वय ४६) व वल्लभ विजय अथणे (वय ३६) अशी र्व जखमींची नावे असून, जुना राजवाडा पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमर जाधव कुटूंबियांसोबत फुलेवाडी रिंगरोड येथे राहतात.त्यांच्या शेजारी राहणाऱ्या वल्लभअथणे यांच्या दारात उंबराचे झाड आहे. या झाडाची फांदी जाधव यांच्या खिडकीत येत असल्याने अमर जाधव यांनी ही फांदी तोडली. याचा जाब विचारत बल्लभ अथणे यांनी परड्यात जाऊन जाधव यांच्या घराकडे कोयता फेकला. अमर जाधव यांना कोयता मारल्याने ते जखमी झाले. या प्रकरणी वल्लभ अथणे आणि त्याच्या आईवर गुन्हा दाखल झाला. दरम्यान, फांदीबाबत विचारणा करण्यावरून अमर जाधव याने मारहाण केल्याचे व नेत्रांजली जाधव यांनी शिवीगाळ केल्याची फिर्याद पोलिसांत दिली.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​