Uncategorized
Kolhapur News : कौशल्य विकास, सकारात्मकतेतूनच यशाचा मार्ग

डॉ. राजेश पाटील यांचे प्रतिपादन
टोप : विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक यशावर लक्ष केंद्रित न करता स्वतःमधील कौशल्यांचा सातत्याने विकास करणे गरजेचे आहे. तसेच आई-वडिलांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास जीवनात यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन प्रेरणादायी वक्ते डॉ. राजेश पाटील यांनी केले.
वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसी, पेठ वडगाव यांच्या वतीने आयोजित ‘उडान २०२६’ या प्रेरणादायी कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमास अशोकराव माने शिक्षण समूहाच्या संचालिका माजी जि. प. सदस्या मनीषा विजयसिंह माने उपस्थित होत्या. प्राचार्य डॉ. बनराज जदगे यांनी महाविद्यालयाचा वार्षिक आढावा सादर केला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली.
डॉ. राजेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी जीवनासाठी आवश्यक असलेल्या गुणांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, चांगले पुस्तक हे आयुष्याचे खरे मार्गदर्शक असते. अपयश हे यशाकडे नेणारे पाऊल आहे, त्यामुळे अपयशामुळे खचून न जाता त्यातून शिकून पुढे जाणे आवश्यक आहे.
सकारात्मक दृष्टिकोन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळेच मोठे यश मिळते. कार्यक्रमास अभिषेक पाटील, प्राचार्य डॉ. आनंद गडद, प्रा. सुशीलकुमार सर्वगोड, प्रा. संदीप पाटील, प्रा. नेहा साळुंखे, वंशिता अडसूळ, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संस्थापक तथा केडीसीसी बँकेचे संचालक विजयसिंह माने यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन डॉ. शितल डांगे, प्रा. श्रद्धा लोकरे यांनी केले. शितल कांबळे यांनी आभार मानले.
Source link



