Uncategorized

अनगोळ परिसरातील समस्यांचा मनपा आयुक्तांकडून आढावा

त. भा.प्रतिनिधी   

बेळगाव : शहरातील समस्या जाणून घेण्यासाठी मनपा आयुक्तांनी वॉर्डनिहाय आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी त्यांनी वॉर्ड क्रमांक 12 मध्ये येणाऱ्या अनगोळ परिसराला भेट देऊन तेथील स्वच्छता, कचऱ्याची उचल तसेच इतर बाबींची माहिती घेतली.

यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मनपा आयुक्त कार्तिक एम. यांनी शनिवारी बजंत्री गल्ली, व•र गल्ली या भागातील ड्रेनेजच्या निचऱ्याची माहिती घेतली. यावेळी काही नागरिकांनी अनगोळ परिसरातील समस्यांचा त्यांच्यासमोर पाढा वाचला. संबंधित अधिकाऱ्यांना त्याची तातडीने माहिती देऊन अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले. यावेळी मनपाचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​